Dhangar Reservation: धनगर आरक्षण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणीला सुरूवात!

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून एसटीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक भागात आंदोलनं झाली आहेत.

Reservation | File Image

महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या (Reservation) मागणीमुळे वातावरण तापलेलं आहे. आज (3 जानेवारी) पासून हायकोर्टात धनगर आरक्षणाची (Dhangar Reservation) सुनावणी सुरू होत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) मध्ये सहभागी करून घ्यावं अशी मागणी जोर धरत आहे. या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरू होत आहे.

धनगर समाजासाठी आजपासून सुरू होणारी सुनावणी ही महत्त्वाची असणार आहे. सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसी अंतर्गत राजकीय आरक्षण आहे, आता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे.

राज्यातील धनगड आणि धनगर या शब्दामुळे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजाला देखील अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून राज्यातील धनगर समाज करत आहेत. आता हे प्रकरण न्यायदरबारी गेले आहे. Dhangar Reservation: धनगर आरक्षण मुद्द्यावरुन तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी घेत संपवलं आयुष्य .

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून एसटीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक भागात आंदोलनं झाली आहे. भाजपाच्या गोपिचंद पडगळकर यांनीही सरकार सत्तेत असूनही या मागणीसाठी आंदोलन छेडले होते.

महाराष्ट्रात दुसरीकडे मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. मात्र हे आरक्षण देताना ओबीसी कोट्याला धक्का न देण्याची ओबीसींंची मागणी आहे. अनेक ओबीसी नेते या आरक्षण प्रकरणी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत. मात्र राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आता घटनादुरूस्ती करणं आवश्यक आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif