Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार

महिन्याभरात धनगर सामाजाला आरक्षण मिळावे म्हणून धनगर आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

धनगर आरक्षण मुद्दा (Archived, edited, images)

Dhangar Reservation :महिन्याभरात धनगर सामाजाला आरक्षण मिळावे म्हणून धनगर आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) दिल्लीला रवाना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच सरकारने केंद्राकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरवा करावा अशी ही मागणी करण्यात येणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यानंतर त्याचे पडसाद आता विविध समाजावर पडू लागले आहेत. त्यामुळे धनगर समाजाला ही आरक्षण मिळावे म्हणून कुरघोडी चालू झाली आहे. तसेच आज दुपारी मुख्यमंत्र्याना राष्ट्रीय समाज पक्षाचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाणार आहे. यावेळी मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत समाजातील प्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्र्यांशी आज या विषयावर चर्चा करणार आहेत.(हेही वाचा-Dhangar Reservation: धनगर समाज जल्लोष केव्हा करणार? प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात 'तारीख सांगणार नाही')

धनगरांना कोणत्या तत्वावर आरक्षण देण्यात यावे याकरिता टीस या संस्थेचे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच टीसने सादर केलेल्या अहवालामध्ये शासनातर्फे आरक्षणाबाबतीत अभ्यास सुरु असल्याचे सांगितले.

या महत्त्वाच्या मुद्दयांवर आरक्षणासाठी मागणी: 

- बॉम्बे रजिस्ट्रेशन अॅक्टमध्ये धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख केला आहे.

-वर्षानुवर्षे धनगर समाज हा मेंढीपालनाचा व्यवसाय करतात.

-या समाजात नृत्य-गायन, देव- देवाताचे विशेष महत्व आणि धनगर समाजाची संस्कृती

-मानववंश शास्र आणि सामाजिक दृष्ट्या भटकी जात असल्याचा उल्लेख

-बिहार आणि झारखंड येथे धनगरांना आदिवासी जमातीत स्थान

-तर धनगड किंवा धनगर हा अर्थ समान असल्याचा दावा



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif