Coronavirus: सेंट जॉर्ज, जीटी, नायर रुग्णालयाला देवेंद्र फडणवीस यांची भेट; कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत डॉक्टर, अधिष्ठात्यांशी केली चर्चा

फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे आणि कोविड व्यवस्थापन प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. तसेच जीटी हॉस्पीटलमध्ये डॉ. अनंत शिंगारे आणि डॉ. देशपांडे यांच्याशी चर्चा करून सद्यस्थितीची माहिती घेतली.

Devendra Fadnavis (PC - Twitter)

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईतील विविध रूग्णालयांत भेट देऊन तेथील डॉक्टरांशी चर्चा केली आणि कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत माहिती घेतली. फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रूग्णालयाचे (Saint George's Hospital) अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे आणि कोविड व्यवस्थापन प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. तसेच जीटी हॉस्पीटलमध्ये डॉ. अनंत शिंगारे आणि डॉ. देशपांडे यांच्याशी चर्चा करून सद्यस्थितीची माहिती घेतली.

कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी संपूर्ण देशात आज डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व आरोग्य कर्मचारी जोखीम पत्करून अतिशय चांगले काम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले आहेत. समाजाची ही फार मोठी सेवा आहे. त्यांचे हे काम संपूर्ण देश कायम आठवणीत ठेवील, अशी भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा - Lockdown: राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत कलम 188 नुसार 95 हजार 678 गुन्ह्यांची नोंद - अनिल देशमुख)

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नायर रूग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. जोशी यांच्याशी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची सुरक्षा आणि गर्दीचे नियंत्रण यात समतोल साधत पोलिस बंधू करीत असलेल्या धाडसी कार्यासाठी पोलिसांचे आभार मानले.