'निसर्ग' चक्रीवादळामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटींची केलेली मदत फारच तोकडी- देवेंद्र फडणवीस
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत असताना फडणवीस यांनी हे विधान केले आहे.
'अम्फान' चक्रीवादळानंतर राज्यात 'निसर्ग' (Cyclone Nisarga) चक्रीवादळाचे संकट घोंघावत होते. तर चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. रायगड येथील स्थानिकांचे मोठे नुकसान होत त्यांच्या घरांची सुद्धा पडझड झाल्याचे दिसून आले. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रायगड जिल्ह्याला भेट देत तेथे पुर्नवसनासाठी 100 कोटींची तातडीची मदत जाहीर केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यासाठी जाहीर केलेली मदत ही तोकडी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत असताना फडणवीस यांनी हे विधान केले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाल्याचे फडवणीस यांनी म्हटले आहे. परंतु राज्य सरकारने तातडीची 100 कोटी रुपयांची केलेली मदत ही योग्य असायला हवी होती असे फडवणीस यांनी म्हटले आहे. त्याचसोबत नुकसान भरपाई म्हणून 75 टक्के मदत सरकारने करणे गरजेचे होते. त्याचसोबत NDRF च्या निकषांपेक्षा अधिक मदत नागरिकांसाठी सरकारने दिली पाहिजे असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.(Cyclone Nisarga चा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला 100 कोटींंची तातडीची मदत जाहीर, पंचनाम्यानंतर भरपाईचं स्वरूप ठरणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा)