Gadchiroli Naxal Attack: गडचिरोली मधील नक्षलवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सी-60 कमांडो जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

शासकीय इतमामात निरोप देत त्यांचे मृतदेह मूळ गावी रवाना करण्यात आले.

Devendra Fadnavis (Photo Credits: ANI / Tweet)

नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रदिनी गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) केलेल्या हल्ल्यात 15 पोलिस जवान आणि एक ड्रायव्हर मृत्यूमुखी पडला. गस्तीवर जाणार्‍या सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करत आइईडी (IED) हल्ला करण्यात आला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी  शहीदांच्या मृतदेहाला श्रद्धांजली अर्पण केली. शासकीय इतमामात निरोप देत त्यांचे मृतदेह मूळ गावी रवाना करण्यात आले. गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यानंतर शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, राजीनाम्याची मागणी

मुख्यमंत्र्यांची शहीदांना श्रद्धांजली 

जांभूर खेडा या भागामध्ये महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. आज त्यांनी बॅनरबाजी करत पूल आणि रस्ते बांधू नका, असे म्हटलं आहे. काल नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची माहिती समजताच समाजाच्या सार्‍या स्तरामधूनच त्याचा निषेध करण्यात आला. आज अनेक मंत्री, पोलिस अधिकार्‍यांनी या भागाला भेट दिली.