Devendra Fadnavis on CM Uddhav Thackeray: बांधकाम धोरणात सुधारणा करा अन्यथा उच्च न्यायालयात PIL दाखल करेन, देवेंद्र फडवणीस यांचे उद्धव ठाकरे यांना 'या' मुद्द्यावरुन पत्र
या पत्रात फडवणीस यांनी राज्य सरकारच्या धोरणांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis on CM Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंग्रजीमधून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात फडवणीस यांनी राज्य सरकारच्या धोरणांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या नावावर काही निवडक रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांचा फायदा करुन देण्याचा प्रयत्न केला जातोय असे ही पत्रात फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काल स्थगित करावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे. अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेन असा इशारा ही फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.(Sanjay Raut On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडीवरून मोर्चा काढल्यानंतर संजय राऊत यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)
कोरोना व्हायरसमुळे बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यावरील उपायांसाठी दीपक पारेख यांच्या समितीकडून काही शिफारसी सुचवण्यात आल्या होत्या. त्यामधीलच काही शिफारसी लागू केल्याचा आरोप आता फडणवीस यांनी केला आहे. तर या बद्दलचा काय परिणाम होईल याचा विचार न करता राज्याच्या याचा मोठा फटका बसेल असे ही फडवणीस यांनी म्हटले आहे.(Shiv Sena On Opposition Situation: ‘मरतुकड्या’ विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे 'ओडास गावची पाटीलकी'- शिवसेना)
Tweet:
दरम्यान, फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांना मुद्दामुन इंग्रजी भाषेत पत्र लिहिले आहे. बांधकाम क्षेत्रात वाढ व्हाली यासाठीच्या सुधारणांच्या विरोधात आम्ही नाही असे फडवणीस यांनी म्हटले आहे. परंतु त्याच्या नावाखली सत्तेचा दुरपयोग करु नये असा टोला ही उद्धव ठाकरे यांना फडवणीस यांनी लगावला आहे.