Devendra Fadnavis On Raj Thackeray Letter: अंधेरी पोट निवडणुकीबाबत राज ठाकरेंच्या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया

राज ठाकरे यांच्या पत्राचा आम्ही नक्कीचं गांभीर्याने विचार करु अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा सुरु आहे ती अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची (Andheri East By Election). या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यात पुन्हा महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुध्द भाजप (BJP) असा सामना बघायला मिळणार आहे. कारण या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या गटाने आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला नसुन त्यांनी फक्त आपल्या मित्र पक्षास पाठींबा दर्शवला आहे. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कैलासवासी आमदार रमेश लटकेंच्या (Ramesh Latke) पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप कडून मूरजी पटेल (Murji Patel) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपला उत्सफुर्त सहभाग नोंदवला नसला तरी या निवडणुकीबाबत एक अनोखी भुमिका घेत देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fednavis) पत्र लिहलं आहे.

 

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार देऊ नये. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना विधानसभेवर बिनविरोध पाठवावे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. तर राज ठाकरे यांच्या या पत्राचा आम्ही नक्कीचं गांभीर्याने विचार करु अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  तसेच याबाबतचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी तसेच मित्रपक्ष बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) बरोबर समन्वय साधून घेवू असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं आहे. (हे ही वाचा:- Andheri (East) Bypoll 2022: 'ऋतुजा लटके यांना आमदार होऊ द्या', राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र)

 

पण शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटासाठी ही फक्त निवडणुक नसुन ती आता प्रतिष्ठेची लढत झाली आहे.  तरी या निवडणुकीत सामना डायरेक्ट शिंदे विरुध्द ठाकरे असा होणार नसुन महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुध्द भाजप (BJP) असा होणार आहे. तयार राज ठाकरेंच्या या पत्रानंतर भाजप काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.