Andheri (East) Bypoll 2022: 'ऋतुजा लटके यांना आमदार होऊ द्या', राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार देऊ नये. ऋतुजा लटके यांना विधानसभेवर बिनविरोध पाठवावे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून राज ठाकरे यांनी एक पत्रच लिहीले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहे.

Andheri (East) Bypoll 2022: 'ऋतुजा लटके यांना आमदार होऊ द्या',  राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र
Devendra Fadnavis, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक (Andheri (East) Bypoll 2022) राज्यभर चर्चेत आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून मुरजी पटेल हे दोन प्रमुख उमेदवार चर्चेत आहेत. दरम्यान, आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार देऊ नये. ऋतुजा लटके यांना विधानसभेवर बिनविरोध पाठवावे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून राज ठाकरे यांनी एक पत्रच लिहीले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहे.

राज ठाकरे यांचे पत्र खालील प्रमाणे

प्रति,

श्री. देवेंद्र फडणवीस

उप-मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य.

प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!

एक विशेष विनंती करण्यासठी हे पत्र आपणांस लिहीतो आहे.

आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट-निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांचया पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कै. रमेश एक चांगले कार्यकर्ता होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्मास खरोखर शांती मिळेल.

माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरची व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढविण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो. अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं.

असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल. (हेही वाचा, Andheri By Election: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मोठा ट्वीस्ट! मुरजी पटेल यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी असल्याचा दावा करत ठाकरे गटाचा भाजप उमेदवारावर आक्षेप)

आपला मित्र

राज ठाकरे

राज ठाकरे फेसबुक पोस्ट

दरम्यान, राज ठाकरे यांचा सल्ला देवेंद्र फडणवीस किंवा भाजप किती मानतो याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेबाबत बोलायचे तर त्यांच्या पक्षाने एखाद्या आमदाराच्या मृत्यूनंतर लागलेल्या निवडणुकीत उमेदवार उभा न करण्याचे कटाक्षाने टाळले आहे. क्वचितच एखाद्या प्रसंगी मनसेने उमेदवार उभा केला असेल. तोही अपवादात्मक स्थितीत. अन्यथा मनसेने हा संकेत कटाक्षाने पाळला आहे हे उल्लेखनीय.

(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2022 01:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).