Cyber Fraud in Pune: अमेझॉनच्या नावे ऑनलाईन टास्क करण्याच्या नादात प्रोफेसरने गमावले 21 लाख; तपास सुरू

फसवणूक करणार्‍यांनी कोंढवा येथे राहणार्‍या सच्चिदानंद रामदास सातपुते यांना ऑनलाईन रिटेलर प्लॅटफॉर्म वर पार्ट टाईम जॉब ची ऑफर केली होती.

Representational Image (File Photo)

आजकाल ऑनलाईन व्यवहारांमध्ये फ्रॉड करण्याचे अनेक नवनवे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये अनेकांचे पैसे बुडाले आहेत. असाच एक प्रकार 42 वर्षीय असिस्टंट प्रोफेसर सोबत घडला आहे. पुण्याच्या या 42 वर्षीय व्यक्तीला 20.6 लाखांचा गंडा बसला आहे. पीडितेला एका अज्ञात व्यक्तीने मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर संपर्क साधला आणि अॅमेझॉनवर ऑर्डर देण्यासाठी कमिशन देऊ केले.

India Today च्या रिपोर्टनुसार, फसवणूक करणार्‍यांनी कोंढवा येथे राहणार्‍या सच्चिदानंद रामदास सातपुते यांना ऑनलाईन रिटेलर प्लॅटफॉर्म वर पार्ट टाईम जॉब ची ऑफर केली. नंतर त्याने जेव्हा कॉल तेव्हा त्याला अकाऊंट बनवण्यास सांगितले. त्याला एक हजार रूपये भरून अकाऊंट रिचार्ज करायला सांगितले. फसवणूक झालेल्या या व्यक्तीनेही त्याला पैसे ट्रान्सफर केले. बॅंकेत 1300 रूपये जमा केले. अधिक तपशील मिळविण्यासाठी, मेसेजमध्ये रेखा रंजन नावाच्या संपर्क व्यक्तीचे तपशील, तिच्या मोबाइल नंबरसह दिले होते.

फसवणूक करणार्‍यांनी नंतर त्याला ऑनलाइन टास्क द्यायला सुरुवात केली आणि त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याच्या खात्यात छोटी रक्कम ट्रान्सफर केली. बदमाशांनी त्याला चांगल्या परताव्याच्या कामांमध्ये वेगवेगळ्या रकमेची गुंतवणूक करण्यास सांगितले. तक्रारदाराने अनेक व्यवहारांमध्ये 20.6 लाख रुपये ट्रान्सफर केले. सातपुते यांनी गुंतवणूक करणे सुरू ठेवल्याने त्यांची कमाई वाढत गेली आणि अखेरीस ते तब्बल 6.75 लाख रुपयांवर पोहोचले. त्याने लक्षणीय नफा कमावला आहे यावर विश्वास ठेवून त्याने पैसे काढण्याचा निर्णय घेतला. पण फसवणूक करणार्‍याने त्याला कळवले की त्याला त्याची कमाई काढण्यापूर्वी आणखी कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. बदमाशांनी सतत पैशांची मागणी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. नंतर, त्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला.