Cyber Crime News Pune: 'थाळी एकावर एक फ्री', सायबर गुन्हेगाराकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक

ऑनलाईन जेवन मागवत असताना 'थाळी एकावर एक फ्री' या ऑफरचा मोह पुणे (Pune News) येथील एका महिलेला चांगलाच महागात पडला. सायबर गुन्हेगारांनी एका महिलेची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली आहे. पोलिसांनी या सायबर चोरट्यांच्या ठिकाणाचा छडा लावला आहे. हे चोरटे केरळ रज्यातील आहेत.

Indian Dish | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Cyber Crime News: ऑनलाईन जेवन मागवत असताना 'थाळी एकावर एक फ्री' या ऑफरचा मोह पुणे (Pune News) येथील एका महिलेला चांगलाच महागात पडला. सायबर गुन्हेगारांनी एका महिलेची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली आहे. पोलिसांनी या सायबर चोरट्यांच्या ठिकाणाचा छडा लावला आहे. हे चोरटे केरळ रज्यातील आहेत. त्यांनी पुण्याील सुकांता येथील 'थाळी एकावर एक फ्री' देण्याची ऑफर फेसबुकवर दिली होती. शुक्रवार पेठ येथे राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रकाश कुमार (रा. गार्डन बाजार, मुन्नर, केरळ) असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्या अन्य साथिदारांवरही गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाहीत. तक्रारदार महिलेने तक्रारीत केलेल्या उल्हेकानुसार ही घटना 22 जुलै 2022 रोजी घडली. फिर्यादीच्या आईने फेसबुकवर सुकांता थाळीची ऑफर पाहिली. ज्यामध्ये 'एका थाळीवर एक थाळी फ्री' असा उल्लेख होता. फिर्यादीच्या वडिलांनी फेसबुकवर ऑफर देणाऱ्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. या वेळी समोरच्या सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती मागितली. तसेच, त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्डवरुन तब्बल 1 लाख 99 हजार रुपये परस्पर काढून घेतले आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास सुरु आहे. केलं आणि लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं.

सायबर क्राईम ही एक प्रकारची गुन्हेगारी कृती आहे. जी संगणक किंवा इंटरनेट वापरून केली जाते. यामध्ये हॅकिंग, फिशिंग, ओळख चोरी, सायबर बुलिंग, ऑनलाइन फसवणूक आणि मालवेअर हल्ले यासारख्या बेकायदेशीर कृतींचा आणि इतरही काही गोष्टींचा समावेश असतो. (हेही वाचा, Noodles Viral Video: अरेरे! नूडल्स असे बनवतात? व्हिडिओ पाहाल तर कदाचित खाण्याचीही इच्छा मरेल)

सायबर क्राईम ही एक झपाट्याने वाढणारी समस्या आहे, कारण अधिकाधिक लोक बँकिंग, खरेदी आणि सामाजिकीकरण यासारख्या विविध कामांसाठी इंटरनेट वापरतात. यामुळे सायबर हल्ल्यांची संख्या आणि अत्याधुनिकता वाढली आहे, ज्यामुळे लक्षणीय आर्थिक, वैयक्तिक आणि प्रतिष्ठेचे नुकसान होऊ शकते.

सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी, सजग राहणे आणि आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. जसे की मजबूत पासवर्ड वापरणे. नियमितपणे सॉफ्टवेअर अपडेट करणे आणि संशयास्पद ईमेल किंवा वेबसाइट टाळणे

दरम्यान, जगभरातील कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी सायबर गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्याचे काम करत आहेत आणि अनेक देशांनी विशेषत: सायबर गुन्ह्यांना लक्ष्य करणारे कायदे केले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now