Cryptocurrency Bitcoin: बिटकॉईन गुंतवणूक वादातून 32 वर्षीय तरुणाची हत्या, तीन आरोपींना अटक; वाशीम येथील घटना

या हत्या प्रकरणात पोलिसांनी वाशीम येथून तिन आरोपींना ताब्यत घेतले आहे.

Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बिटकॉईन (Bitcoin) गुंतवणुकीबाबत माहिती देणाऱ्या आणि त्यासाठी सेमिनार घेणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी वाशीम येथून तिन आरोपींना ताब्यत घेतले आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे गावातील एका शेता 12 सप्टेंबरच्या सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. बंदुकीच्या गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आल्याचे पुढे आले होते. मालेगाव पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तातडीने तपास चक्रे फिरवली मृताची ओळख पटवली. तसेच, तीन आरोपींना ताब्यात घेतले. बिटकॉईनमधील गुंतवणुकीवरुन झालेल्या वादातातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत तरुण हा बिटकॉईन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी सेमिनार आयोजित करत असे. Ether trade Asia च्या बिट कॉईनच्या व्यवसायात मुख्य आरोपी निशिद वासनिक याच्याकडे लोकांनी गुंतवणूक करावी, यासाठी मृत तरुण सेमिनारच्या माध्यमातून प्रयत्नशील असे. या व्यवसायात झालेल्या गुंतवणुकीचा तो तपशीलासह नोंदही ठेवत असे. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Dogecoin यांची किंमत कशी ठरते? कोणते घटक ठरतात कारणिभूत?)

विक्की उर्फ विकल्प विनोदराव मोहोड (रा. आराधना नगर, खरबी, पोस्टे वाठोडा (मुख्य आरोपी)), शुभम उर्फ लाला भीमरावजी कन्हारकार (वय 22 वर्ष, रा. आराधना नगर, नागपूर), व्यकेश उर्फ टोनी मिसन भगत (वय 25 वर्ष रा. आराधना नगर, नागपूर) अशी या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आणखी दोन आरोपींच्या पोलीस मागावर आहेत. दरम्यान, निशिद महादेव वासनिक ((मुख्य आरोपी) रा. आराधना नगर, नागपूर) , गज्जू उर्फ गजानन मुनगुने आणि एका अनोळखी महिलेचाही या प्रकरणात समावेश आहे.

बिटकॉईनच्या कमाईतून आलेल्या पैशांमध्ये झालेला फेरफार आणि अधिक पैशांचा लोभ यातून आरोपींनी तरुणाचे नागपूर येथून अपहरण केले. या तरुणाचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. पोलीस तपासात पुढे आले आहे की, मुख्य आरोपी निशिद वासनिक याने अपहरण केलेल्या तरुणाला वाशिममध्ये रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी उतरवले व त्याच्यावर गोळ्या झाडल्या.