COVID19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी तयार, मुंबई लोकलबद्दल आदित्य ठाकरे यांनी केले 'हे' विधान
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रात अनलॉकिंची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु झाली आहे. अशातच आता राज्य सरकारकडून तिसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.
COVID19 Third Wave: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रात अनलॉकिंची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु झाली आहे. अशातच आता राज्य सरकारकडून तिसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. अशातच महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत एबीपी माझा यांनी बातचीत केली. तेव्हा त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह मुंबई लोकल बद्दल महत्वाचे विधान केले आहे.(Watch Video: प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनमध्ये अडकला प्रवासी, RPF जवानने अशाप्रकारे वाचवला जीव)
आदित्य ठाकरे यांनी असे म्हटले की, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या संबंधित लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेत आहोत. मात्र असे समजले नाही पाहिजे की, कोरोनाच्या लाटा संपल्या आहेत की कोरोना आपल्यापासून दूर केला आहे. या गोष्टीबद्दल वेळोवेळी सांगावे लागत आहेत. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी झाला म्हणजे कोरोना आपल्याला होणार नाही असे नाही आहे. अशावेळी एखाद्याला तो झालेला सुद्धा असू शकतो. कोविडच्या विरोधात लढण्यासाठी आपल्यासह जगाला सुद्धा वेळ लागणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासठी आम्ही तीन गोष्टींवर खासकरुन लक्ष देत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यामध्ये प्रथम कॉर्पोरेट प्रतिसाद, मेडिकल आणि तिसरा म्हणने नागरिकांच्या प्रतिक्रिया या तीन गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. मेडिकच्या दृष्टीने आम्ही बेड्सची संख्या वाढवत आहोत. औषध, लस आणि आयसीयुची संख्या सुद्धा वाढण्याकडे भर दिला जात आहे. मुलांसाठी पहिल्यांदाच टास्क फोर्स महाराष्ट्रात तयार करण्यात आली.(Nawab Malik on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस मोफत देण्याच्या घोषणेनंतर नवाब मलिक यांची 'या' भाषेत टीका)
त्याचसोबत आदित्य ठाकरे यांना लोकलबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी असे म्हटले की, कोरोनाचे आकडे कमी झाल्याने आपण असे वागत आहोत की कोरोना संपला आहे. मात्र लोकल ट्रेन बद्दल बोलायचे झाल्यास याबद्दल निर्णय आता घेऊ शकत नाही. प्रत्येक निर्णयापूर्वी मेडिकल एक्सपर्ट्स सोबत बातचीत करावी लागणार. जेव्हा मेडिकलटास्क फोर्स यासाठी काही सांगेल तेव्हाच निर्णय घेतला जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)