COVID-19 Vaccine: कोरोनावरील लस सर्वप्रथम कोणाला दिली जाणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले स्पष्ट

कोरोनावर (Coronavirus) मात करण्यासाठी जगभरातील अनेक वैज्ञानिक लस (COVID-19 Vaccine) शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. कोरोनावर शंभर टक्के गुणकारी ठरणारी लस कधी विकसित होईल? याबाबत अद्याप काहीच सांगता येत नाही. परंतु, दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी, यासाठी लॉबिंग सुरू आहे.

COVID-19 Vaccine: कोरोनावरील लस सर्वप्रथम कोणाला दिली जाणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले स्पष्ट
Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

कोरोनावर (Coronavirus) मात करण्यासाठी जगभरातील अनेक वैज्ञानिक लस (COVID-19 Vaccine) शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. कोरोनावर शंभर टक्के गुणकारी ठरणारी लस कधी विकसित होईल? याबाबत अद्याप काहीच सांगता येत नाही. परंतु, दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी, यासाठी लॉबिंग सुरू आहे. परंतु, कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर सर्वप्रथम कोणाला दिली जाणार? याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे, त्यांची यादी करण्याचे काम सुरू आहे. या यादीत नाव येण्यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, कोणी कितीही लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला तरी कोरोनाची लस सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना देण्यात येणार, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

कोरोनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट होत असताना दिवाळीनंतर पुन्हा एकदा रुग्णांच्या सख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे कोरोनाची लस कधी बाजारात येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, कोरोनाची लस सर्वप्रथम आपल्याला मिळावी, याकरीता राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. परंतु, कोरोनाची लस सर्वप्रथम डॉक्टर आणि पोलिसांना दिली जाणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे लॉबिंग करणाऱ्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. हे देखील वाचा- Maha Vikas Aghadi: शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल- संजय राऊत

अदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत 4 कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस 70 टक्के परिणामकारक आहे. लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे, असे अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध करणार असल्याचे पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2020 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).