महाराष्ट्रातील खासगी लॅबमध्ये COVID19 च्या चाचणीसाठी नागरिकांना 300 रुपये कमी मोजावे लागणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात असे म्हटले आहे की, सर्व कॅटेगरीसाठी ठरवण्यात आलेल्या रक्कमेसाठी हे दर कमी केले जाणार आहेत. राज्यात सध्या तीन कॅटेगरी असून त्यानुसार नागरिकांना चाचण्यांसाठी पैसे मोजावे लागतात.

Medical workers (Photo Credits: IANS)

राज्य सरकारने कोविड19 च्या चाचणीसाठी खासगी लॅबकडून घेण्यात येणाऱ्या दरात घट केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात असे म्हटले आहे की, सर्व कॅटेगरीसाठी ठरवण्यात आलेल्या रक्कमेसाठी हे दर कमी केले जाणार आहेत. राज्यात सध्या तीन कॅटेगरी असून त्यानुसार नागरिकांना चाचण्यांसाठी पैसे मोजावे लागतात. जर एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वॅब घरुनच घेऊन चाचणीसाठी द्यायचा असल्यास त्याच्याकडून प्रत्येक टेस्टसाठी 2800 रुपये घेतले जात होते. परंतु आता त्यासाठी नागरिकांना 2500 रुपये द्यावे लागणार आहे. दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच जर स्वॅब रुग्णालयातून घेऊन चाचणी केंद्रात द्यायचे झाल्यास त्यासाठी 2500 रुपयांऐवजी 2200 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच व्यक्तीने स्वत: हून लॅब मध्ये जात टेस्ट केल्यास त्याला 2200 ऐवजी 1900 रुपये द्यावे लागणार आहेत.

सरकारने कोरोनाच्या चाचणीसाठीचे हे दर दुसऱ्यांदा कमी केले आहेत. जुन महिन्यात त्यांनी चाचणीसाठी आकारण्यात येणारे पैसे दराच्या अर्धे असतील असे म्हटले होते. तर कोरोनाची चाचणी सर्वांना करणे परवडेल म्हणून त्याच्या दरात कपात केली आहे. तसेच गेल्या काही महिन्यात पीपीई किट्सह चाचण्यांच्या किंमती ही कमी झाल्या आहेत. त्यामुळे खासगी लॅबने नागरिकांना उत्तम सुविधा द्यावी.(Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स)

टोपे यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, येत्या काही दिवसात मास्क आणि सॅनिटायझर्स संदर्भातील दर सुद्धा ठरवले जाणार आहेत. यासाठी एक कमिटी तयार करण्यात येणार असून ते लोक दराबद्दल अभ्यास आणि किती रुपयांना असावे या संदर्भात ठरवणार आहेत. तर कोरोनाच्या चाचणीसाठी आकारण्यात येणाऱ्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नियुक्त समितीने घेतला आहे. त्यामुळे रुग्णाला आपल्यावर आर्थिक बोझा अधिक असल्याचे भासणार नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तर आता खासगी लॅबला नव्याने लागू करण्यात आलेल्या दरानुसार कोरोनाच्या चाचणीसाठी पैसे नागरिकांकडून वसूल करावे लागणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif