Covid-19: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितला राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा अधिकृत आकडा
या लॅब वाढण्यासाठी राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी (राजेश टोपे) केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या बोलणी केली आहेत. असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात आजघडीला कोरना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या १२ इतकी आहेत. त्यापैकी पुणे येथे ९, मुंबईत 2 आणि नागपूर येथे 1 असा हा तपशील असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसबाबत राज्यातील एकूण स्थितीबाबत टोपे यांनी माहिती देत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोना व्हायरस (Covid-19) बाधित जे रुग्ण सापडले आहेत त्यातील कोणत्याही रुग्णाला तीव्र स्वरुपाचा त्रास नाही. या रुग्णांवर आवश्यक ते सर्व उपचार करण्यात येत आहे, असेही टोपे या वेळी म्हणाले.
राज्यातील सर्व प्रकारचे शासकीय, धार्मिक आणि राजकीय तसेच स्थानिक पातळीवर साजरे केले जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये. त्याबाबत सक्त सुचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. मात्र नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरस बाबत आवश्यक त्या सर्व चाचण्या करण्यासाठी राज्यातील लॅब वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या लॅब वाढण्यासाठी राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी (राजेश टोपे) केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या बोलणी केली आहेत. असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
असंही निदर्शनास आले आहे की, नागरिक स्वत:हूनच रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि आमची कोरोनाची तपासणी करा असा आग्रह करत आहेत. पण, नागरिकांनी असे करण्याची आजिबात गरज नाही. जे लोक कोरोना व्हायरसचा अती प्रादूर्भाव असलेल्या 7 देशांतून आले आहेत त्यांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांवरच कोरनाची चाचणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल. अनावश्यकपणे तपासणीची मागणी करुन नागरिकांनीही लॅब आणि आरोग्य प्रशासनावरचा ताण वाढवू नये, असे अवाहनही राजेश टोपे यांनी या वेळी केले. (हेही वाचा, पुणे: राज्यात कोरोना व्हायरस संक्रमीत रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली; पिंपरी चिंचवड येथे नव्याने 3 जणांना Covid-19 ची लागण)
काही लोक विशिष्ट प्रकारच्या मास्कचीच मागणी करत आहेत. परंतू, या मास्कचीही आवश्यकता नाही. हे मास्क डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफसाठी असतात. मास्कपेक्षा स्वच्छ धुतलेला रुमाल वापरला तरीही चालू शककते. प्रत्येक वेळीच सॅनिटायजर वापरण्याचा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी साबन वापरला तरीही चालू शकते. उगाच घाबरुन जाऊन गोंधळ वाढविण्याची काहीच गरज नाही, असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.