Coronavirus Updates: मुंबई महापालिका उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई महापालिकेतील (BMC) एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांसह बळींचा आकडा सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने सुद्धा नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड योद्धे सुद्धा सध्याच्या काळात जीवाची पर्वा न करता त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. याच दरम्यान आता मुंबई महापालिकेतील (BMC) उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.(BMC Guidelines: मुंबईत सोमवार- शनिवार दरम्यान मार्केटसह दुकाने सुरु करण्यास परवानगी; मार्केट कॉम्पेक्स आणि मॉल्स राहणार बंद)
मुंबई महापालिकेने याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, पाणीपुरवठा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आता या अधिकाऱ्याचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर तेथे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.(मीरा भाईंदर: शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू)
दरम्यान, मुंबई महापालिकेकडून आज कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मार्केट आणि दुकाने सुरु करण्यासंबंधित नवी मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आली आहे. त्याचसोबत राज्य सरकार सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. एकूणच मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास कोविड19 चा आकडा 50 हजारांच्या पार गेला आहे.