Coronavirus: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांच्याही वर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले हे अवाहन

राज्यात पुन्हा एकदा 46 हजार कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती देताना सांगितले की राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2,25,000 इतकी आहे.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची लाट पुन्हा एकदा वाढते आहे. राज्यात पुन्हा एकदा 46 हजार कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती देताना सांगितले की राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2,25,000 इतकी आहे. असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याची काळची नाही. आरोग्य विभाग आणि राज्य सरकार खंबीर आहे. फक्त नागरिकांनी जर घरच्या घरी किटद्वारे चाचणी केली तर त्याची माहिती आरोग्य विभागाला द्यायला हवी असे अवाहन राजेश टोपे यांनी केले. राज्यातील पॉझीटीव्ह आलेल्या एकूण रुग्णांपैकी 86% रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

अनेक लोक सेल्फ किटद्वारे चाचणी करतात. ती चाचणी पॉझिटीव्ह आली असता त्यातील बरेच लोक आरोग्य विभागाला कल्पना देत नाहीत. या लोकांनी आरोग्य केंद्रावर जाऊन आपल्याबाबत माहिती द्यायला हवी. आम्ही ओरोग्य केंद्र आणि संबंधित विभागांनाही कल्पना देऊन ठेवली आहे की, जे लोक सेल्फ किटद्वारे चाचणी करतात आणि त्यांना सौम्य लक्षणे असतील तर अशा नागरिकांना होम क्वारंटाईनच राहू देत. होम क्वारंटाईन असलेल्यांना आरोग्य विभागातून फक्त दोन कॉल करुन तुमच्या आरोग्यासंदर्भात माहिती जाणून घेतली जाईल. लक्ष ठेवले जाईल. (हेही वाचा, Coronavirus in Pune: पुण्यातील कोविड-19 लाट जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शिगेला पोहचू शकते; जाणून घ्या सध्याची परिस्थिती)

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

अनेक नागरिकांनी अद्यापही लसीकरणास प्राधान्य दिले नाही. काहींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. काहींनी एकच घेतला आहे मात्र दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले नाही. काहींना बुस्टर डोसची गरजही भासते आहे. नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात लसीकरणास प्राधान्य द्यायला हवे असेही टोप म्हणाले. जिल्हाधिकारी, आयुक्तांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना लसीकरणासाठी पुढे आणले पाहिजे अशी भावना व्यक्त करतानाच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच कार्यालयात प्रवेश देण्याबाबत आता विचार करावा लागेल असेही टोपे म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif