Coronavirus in Maharashtra: ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरियंट महाराष्ट्रात आढळल्याने चिंता वाढली, पुण्यात दोघांना संसर्ग

भारतासह जगभरताली अनेक देशांमध्ये कोरोनाचे वेगवेगळे व्हेरीएंट पाहायला मिळत आहेत. भारतातच कशाला महाराष्ट्रातही कोरोना पुन्हा डोके वर काढतो की काय? अशी चिंता व्यक्त होते आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचा जोर जगभरात कमी आला असला तरी धोका अद्यापही टळला नाही. भारतासह जगभरताली अनेक देशांमध्ये कोरोनाचे वेगवेगळे व्हेरीएंट पाहायला मिळत आहेत. भारतातच कशाला महाराष्ट्रातही कोरोना पुन्हा डोके वर काढतो की काय? अशी चिंता व्यक्त होते आहे. पुणे शहरात कोरोनाच्या ) ओमायक्रॉन(Omicron) सबव्हेरियंट बीए.5 (Sub Variant BA.5) आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे. या सब व्हेरीएंटचे दोन रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण दोन रुग्णांना झाल्याचे आतापर्यंतच्या चाचणीत निष्पन्न झाले आहे. दोन्ही रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. पण सांगितले जात आहे की, हे दोन्ही रुग्ण महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत. ते महाराष्ट्राबाहेरील आहेत. व्यावासायानिमित्त ते पुण्याच्या ग्रामीण भागात वास्तव्याला होते. (हेही वाचा, New COVID-19 Omicron Sub-Variant BA.2.75: भारतामध्ये आढळला नवा कोविड 19 ओमिक्रॉन सब व्हेरिएंट)

आरोग्य विभागाने माहिती देताना म्हटले आहे की, हे दोघे जण दुबईहून पुण्याला परतले. या वेळी पुणे विमानतळावर त्यांनी नियमीत तपासणी केली. या वेळी दोघेही पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आला. महत्त्वाचे म्हणजे दोघेही बाधित असले तरी त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नव्हती. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. काही काळातच ते कोरोनामुक्तही झाले होते.

राज्यात ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्स संक्रमितांची संख्या वाढत आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या रुग्णांची एकूण संख्या 160 पेक्षाही अधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सची लागण झालेल्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या खालील प्रमाणे.

दरम्यान, शेवटची माहिती हातीला आली तेव्हा शुक्रवार, 22 जुलै राजी राज्यात 2515 रुग्णांची नव्याने भर पडली. तर 2449 रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोना संक्रमित 6 जणांचा मृत्यू झाला. राज्यात उपचार घेऊन एकूण 78,67,280 बरे झाले आहेत. हे प्रमाण 97.97% इतके आहे. राज्यातील मृत्यूदर 1.84% इतका झाला आहे.