मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याप्रकरणी किरीट सोमैया यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. याच दरम्यान, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. याच दरम्यान, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णाने केलेली ही पहिली आत्महत्या आहे. या प्रकरणी आता भाजप नेते किरिट सोमैया यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत असे म्हटले आहे की, सेव्हन हिल्स रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्येमुळे धक्का बसला आहे.
किरिट सोमैया यांनी ट्वीट करत असे ही म्हटले आहे की, सेव्हन हिल्स मधील कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्यानंतर त्याची बायको आणि मुलगी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या दोघांना सध्या कांजूर येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचसोबत परिवाराने महापालिका आणि पोलिसांच्या वर्तवणूकीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. परंतु रुग्णाने आत्महत्या का केली यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.(Coronavirus: पुण्यात आज दिवसभरात 135 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2380 वर पोहोचली)
किरिट सोमैया यांनी दोन दिवसांपूर्वी एका रुग्णालयातील एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये रुग्णालयातील रुग्ण उडी मारताना दिसून येत आहे. त्यांनी हा व्हिडिओ सायन रुग्णालयातील असल्याचा दावा केला होता. त्याचसोबत सोमैय्या यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्यासरकारवर रुग्णांची नीट काळजी घेत नसल्याचा आरोप सुद्धा लावला होता.(स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी- चंद्रकांत पाटील)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे 10 ते 17 मे पर्यंत लॉकडाउनच्या नियमाचे अधिक कठोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणची कोरोनाची परिस्थिती पाहून कोरोनाचे नियम शिथील केले असले तरीही काही नियम आणि अटी सुद्धा लागू करण्यात आल्या आहेत.