Coronavirus: धारावीत कोरोना व्हायरसचा तिसरा बळी, मुंबई महापालिकेची माहिती
तर आता धारावीत कोरोना व्हायरसमुळे तिसरा बळी गेल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाउनचे सरकारकडून आदेश दिले आहेत तरी त्याचे उल्लंघन केले जात आहे. परिणामी पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. दुसऱ्या बाजूला रुग्णालयातील वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधितांवर दिवसरात्र काम करत आहेत. तसेच महापालिकेने मुंबईतील ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत ते परिसर सील केले आहेत. तेथील नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील सर्वाधिक झोपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) सुद्धा कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. तर आता धारावीत कोरोना व्हायरसमुळे तिसरा बळी गेल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
धारावी येथे एका 70 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीत आतापर्यंत तीन जणांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. बुधवार पर्यंत धारावी येथे 2 नवे रुग्ण आढळल्यानंतर आकडा 9 वर पोहचला होता. यापूर्वी एका 35 वर्षीय डॉक्टरची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.(मुंबई: धारावीतील कंटेनमेंट, बफर झोन मध्ये भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाल्यांना बंदी; कोरोना व्हायरसचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी BMC चे आदेश)
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण धारावीत आढळून आला होता. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धारावीतील काही भाग सील करण्यात आला. मात्र त्यावेळी काही लोकांनी बीएमसी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात विविधा कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी सुद्धा धरावी येथे दोन जणांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.