कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्याची राज्य सरकारकडून सुचना
त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी टोपे यांनी राज्यात पार पडणारी MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्यात यावा असे आदेश दिले आहेत.
चीन शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जाळे संपूर्ण जगभरात पसरले आहे. तसेच भारतासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने दिवसेंदिवस नवी प्रकरणे समोर येत आहेत. तर राज्यात साथीचा कायदा लागू करण्यात आला आहे. ऐवढेच नाही तर मुंबईत जमाव बंदी लागू केली आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील कस्तुरबा येथील कोरोना संक्रमित रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी टोपे यांनी राज्यात पार पडणारी MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्यात यावा असे आदेश दिले आहेत.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एकूण 80 कोरोना संशयितांना ठेवण्यात आले आहे. त्याचसोबत रुग्णालयात बेडची क्षमता अधिक वाढवण्यात येणार आहे. ऐवढेच नाही तर तपासणी प्रयोगशाळांमध्ये सुद्धा पुढील दोन दिवसात वाढ करण्यात येणार आहे. तर राज्यात 10 वी आणि 12 व्या परिक्षा वेळापत्रकानुसार होणार आहे. परंतु एमपीएससीच्या परिक्षा 31 मार्च पर्यंत रद्द कराव्यात असे ही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.(कोरोना व्हायरसमुळे मुंबईतील राणीची बाग तर पुण्यात अंगवाड्या बंद)
महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण झाल्याची 30 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर सरकारने नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांना सुद्धा 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहिर केली आहे. ऐवढेच नाही तर गर्दीच्या ठिकाणी जाळ्याचे टाळावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तर मुंबईतील राणीबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुण्यात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने तेथील शाळा बंद केल्यानंतर आता अंगणवाड्या सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे.