Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या सर्वाधिक चाचण्या; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची सख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतातही सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. यातच महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची सख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतातही सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. यातच महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आतापर्यत 33 हजार चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 1652 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील एकही रुग्ण सुटता कामा नये, याची खबरदारी घेतली जात आहे, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून आज 189 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. या 11 कोरोनाबाधीत पैकी तिघांचा मृत्यू गेल्या 4 दिवसांत झाला असल्याची माहिती आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन त्रिस्तरीय वर्गवारी करण्यात आली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 91 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे येथील असून उर्वरित 9 टक्के रुग्ण हे राज्याच्या इतर भागातील आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांना लक्षणे नसून 25 टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर 5 टक्के रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच 70 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण यांची प्रकृती चांगली आहे. 5 टक्के रुग्णांची अवस्था ही थोडी चिंताजनक आहे. लॉकडाउन वाढवण्यात आला आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात शिस्त पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर हा कालावाधी आणखी वाढू शकतो असेही स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: ठाणे येथील महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह

दरम्यान, सर्वांनी आरोग्यसेतू ऍप डाऊनलोड करण्याचेही आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. याशिवाय राज्यात खासगी रुग्णालय सुरू होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पूल टेस्टिंग संकल्पना राज्याच्या वतीने मांडली आहे. अमेरिकेतील महाराष्ट्राचे डॉक्टरांनी त्यांचा अभ्यास करून मांडला आहे. त्यांनी आपल्या राज्याला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. यात सोसायटी किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची चाचणी घ्यायची पॉझिटिव्ह आली. तर सर्वांचीच चाचणी करण्यात येईल. यामुळे कोरोना चाचणी घेण्याचा वेळ कमी होईल, असेही टोपे म्हणाले आहेत.

गेल्या 12 तासांत महाराष्ट्रात 92 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यात फक्त मुंबईतील 72 जणांचा समावेश आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये 2, मालेगावमध्ये 5, पनवेलमध्ये २, केडीएमसीमध्ये 1, ठाण्यात 4, पालघरमध्ये 1, नाशिक शहरात 1 , पुण्यात 1, अहमदनगरमध्ये 1 आणि वसईत 1 असे रुग्ण आढळले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement