Coronavirus: कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडून 1 हजार पीपीई किट्स, मास्कची मदत

ही मदत अमित ठाकरे यांनी 'मार्ड' या डॉक्टरांच्या संघटनेला देऊ केली असून त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करण्यात आले आहेत.

Amit Raj Thackeray | Photo Credits: Instagram

जगभरासह भारतात सुद्धा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा असल्याने नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन केले जात आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार केले जात आहेत. मात्र एखाद्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारे पीपीई किट्स आणि मास्क याचा तुटवडा जाणवून येत आहे. याच पार्श्वभुमीवर मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray)  यांनी कोरोना फायटर्ससाठी 1 हजार पीपीई किट्स आणि मास्क यांची मदत केली आहे. ही मदत अमित ठाकरे यांनी 'मार्ड' या डॉक्टरांच्या संघटनेला देऊ केली असून त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करण्यात आले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत अमित ठाकरे यांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी मदत केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 1 हजार पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या मार्ड संघटनेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अमितचे मार्ड संघटनेने आभार मानले आहेत. त्याचसोबत डॉक्टर्स जसे जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी डॉक्टरांचे ही आभार मानले आहेत.(मुंबई: कोरोनामुक्त 4 रूग्णांमध्ये आढळल्या अ‍ॅन्टी बॉडीज; अत्यावस्थ रुग्णांना Plasma Therapy देण्यासाठी होणार मदत, BMC चे COVID Survivors ना प्लाझ्मा डोनेशचं आवाहन)

दरम्यान, कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. तर लॉकडाउनमुळे कामगारांना याचा सर्वात मोठा फटका बसला असून त्यांच्यांसाठी सुद्धा राज्य सरकारने शेल्टर होमची सोय केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8068 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.