Coronavirus: महाराष्ट्रात लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1410 जणांना अटक तर 65 लाखाहून अधिक दंड वसूल
तर 65 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णंवर दिवसरात्र डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्चमाऱ्यांकडून उपचार केले जात आहे. तसेच या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना पुरवण्यात येणार आहे. मात्र नागरिकांना घराबाहेर विनाकारण फिरण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात लॉकडाउनचे आदेशाचे उल्लंघन केलेल्या 1414 जणांच्या विरोधात कारवाई करत त्यांना अटक करण्यात आले आहे. तर 65 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 हजाराहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 7570 वाहने जप्त करण्यात आली असून 65,43,624 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला 49,708 जणांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याने क्वारंटाइन करण्यात आले आहे. कलम 188 अंतर्गत 23,126 गुन्हे आणि 4,47,050 स्थलांतरित कामगारांना 4532 कॅम्पमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.(Coronavirus: माहिम मच्छिमार कॉलनीत कडकडीत बंद, नागरिकांकडून जीवनावश्यक वस्तूंचा घरात साठा)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर लॉकडाउन वाढवणे की नाही हे आता सर्वस्वी नागरिकांच्या हातात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा राज्यातील आकडा 700 च्या पार गेला आहे.