Coronavirus Lockdown: महाराष्ट्रात संचारबंदीच्या काळात दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप होणार; 'या' टोल फ्री नंबरवर मिळेल मदत
धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार टोल फ्री क्रमांकावर राज्यभर नागरिकांना या सुविधेचा वापर करता येणार आहे.
कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार आहे. त्यामुळे अशा कठीण काळात समाजातील दिव्यांगांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी दिव्यांगांना घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी खास मदतकेंद्र सुरू केली आहेत. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार टोल फ्री क्रमांकावर राज्यभर नागरिकांना या सुविधेचा वापर करता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडायची असेल तर सक्तीने घरात बसणं अनिवार्य आहे. मात्र याकाळात जीवनावश्यक वस्तू, औषधं मिळणं देखील गरजेचे आहे. त्यामुळे यावेळेस समाजातील कोणत्याच स्तरातील व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून सरकार विशेष लक्ष देऊन आहे. त्यानुसार आता दिव्यांगांनाही विशेष मदत केंद्र सुरू केली जाणार आहेत. Coronavirus Lockdown: कर्जाच्या हफ्तांच्या वसुलीला 3 महिने स्थगिती देण्याचा RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा बॅंकांना सल्ला.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 135 वर पोहचला आहे. तर देशामध्ये 724 कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी 17 जणांनी आपला जीव गमावला आहे. आता जनसमान्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घरीच बसावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
इथे मिळणार दिव्यांगांना मदत
काल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजना अंतर्गत या पॅकेज अंतर्गत सुमारे 8 श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गरीब विधवा-पेंशनर्स-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला स्कीम, सेल्फ हेल्प ग्रुप (वुमन), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स यांना EPFO च्या माध्यमातून, कंस्ट्रक्शन वर्कर्स आदींनाही या पॅकेजचा लाभ मिळणार आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या दरम्यान 1,70000 कोटी रुपयांचे खास पॅकेज केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.