कोरोना व्हायरसमुळे कोल्हापूर मधील 34 जण इराणमध्ये अडकले, सुप्रिया सुळे यांची मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव
त्यामुळे त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
चीन मधील वुहान शहरापासून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) जाळे जगभर पसरले आहे. त्यामुळे आतापर्यंत मृतांका आकडा दिवसेंदिवस वाढ होत चालली असून नवी प्रकरणे सुद्धा समोर येत आहेत. तर अनेक देशांमध्ये अलर्ट जाहिर करण्यात आला असून 48 देशात कोरोनाचे थैमान पसरले आहे. परंतु कोरोनाच्या बाबत वेळोवेळी दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना सरकारकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर इराण येथे कोल्हापूर (Kolhapur) मधील 34 जण अडकले आहेत. त्यामुळे त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सुप्रीया सुळे यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे विमानवाहतूक बंद करण्यात आली आहेय. त्यामुळे इराण मध्ये अडकलेले कोल्हापूर आणि परिसरातील 34 जण अडकले आहेत. तर या सर्वांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावी अशी मागणी सुप्रीया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी केली आहे. इराण मध्ये अडकलेल्यांची नावे आणि पासपोर्टचा तपशील याची माहिती देण्यात आल्याचे ही सुप्रीया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.(Coronavirus: भारतात कोरोना व्हायरसे 2 रूग्ण आढळले; दिल्ली, तेलंगणा येथील नागरिकांच्या मनात घबराट!)
तर काही दिवसांपू्र्वीच जपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवर गेल्या 20 दिवसांपासून अडकून पडलेले 119 भारतीय मायदेशी परतले आहेत. 27 फेब्रुवारीला एअर इंडियाच्या विशेष विमानाने या भारतीयांना दिल्लीमध्ये (Delhi) आणण्यात आले. या विमानामध्ये भारतीयांशिवाय श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रीका आणि पेरुच्या नागरिकांचाही समावेश होता.