Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 364 जणांना कोरोनाची लागण तर 4 जणांचा गेल्या 24 तासात बळी

त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान राज्यातील पोलीस दलातील आणखी 364 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 4 जणांचा बळी गेला आहे. सध्या पोलीस दलात एकूण 3796 अॅक्टिव्ह रुग्ण असून 16363 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Maharashtra Police | (Photo Credit: Maharashtra Police)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान राज्यातील पोलीस दलातील आणखी 364 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 4 जणांचा बळी गेला आहे. सध्या पोलीस दलात एकूण 3796 अॅक्टिव्ह रुग्ण असून 16363 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पोलीस दलात एकूण 20367 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 208 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.(Maharashtra Police Bharti 2020: महाराष्ट्रात होणार तब्बल 12,500 पोलिसांची भरती; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)

राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह औरंगाबादसह अन्य काही जिल्हे हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरत आहेत . तर कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत नागरिकांना सुद्धा नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा वेग जरी वाढत असला तरीही मृत्यूदर काहीशा प्रमाणात कमी झालेला दिसून आला आहे.(Women Harassment Cases: कोविड सेंटर मध्ये महिलांंवरील अत्याचाराच्या घटनांवरुन देवेंद्र फडणवीस यांंचे उद्धव ठाकरे यांंना पत्र, वाचा सविस्तर)

दरम्यान, काल दिवसभरात एकुण 23,365 नवे रुग्ण आढळले असुन राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 11,21,221 वर  पोहचली आहे. कालपासुन राज्यात कोरोनामुळे 474 जणांंचा मृत्यु झाला असुन एकुण कोरोना मृतांंची संख्या 30,883 इतकी झाली आहे. या सगळ्या वाढलेल्या आकडेवारीत एक दिलासादायक माहिती अशी की राज्यात आज दिवसभरात 17,559 रुग्णांंना डिस्चार्ज देण्यात आला आहे यानुसार आजवर कोरोनामुक्त  झालेल्या रुग्णांंचा आकडा हा 7,92,832 इतका झाला आहे. सद्य घडीला राज्यात कोरोनाचे 2,97,125 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.