Coronavirus In Maharashtra: सांगली मध्ये एकाच कुटुंबात 5 जण तर मुंबई शहरात 4 Covid 19 चे नवे रूग्ण; राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 116
आज (25 मार्च) सकाळी सांगली येथील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचं समोर आलं आहे तर आता मुंबई शहरामध्ये 4 नवे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये होणारी वाढ दिवसेंदिवस COVID 19 आजाराचा विळखा घट्ट करणारी आहे. दरम्यान राज्यात आता कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होऊन ती 116 पर्यंत पोहचली आहे. दरम्यान आज (25 मार्च) सकाळी सांगली येथील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचं समोर आलं आहे तर आता मुंबई शहरामध्ये 4 नवे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान मुंबईच्या चार नव्या कोरोना बाधितांमध्ये सदस्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आणि काही जण त्यांच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान सध्या उपचार घेत असलेले 14 सदस्य लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज होतील. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आज पुण्यात नायडू रूग्णालयातूनही महाराष्ट्रात आढळलेले पहिले कोरोनाबाधित दांम्पत्य कोरोना व्हायरस मुक्त झाल्याने घरी गेले आहे. मात्र अजुन पुढील 14 दिवस त्यांना घरीच होम क्वारंटाईन ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Coronavrius: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात 'हेल्पलाईन नंबर' ची घोषणा.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधितांवर सरकारी आणि खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान हा आजार जनसामान्यांमध्ये झपाट्याने पसरू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून पुढील 21 दिवस भारत देश लॉकडाऊन केला आहे. म्हणजे 14 एप्रिलपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. मात्र अत्यावश्यक सेवा या लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्या आहेत. नागरिकांना घरीच बसण्याचेआवाहन केले आहे. सांगली: लॉकडाऊनच्या काळात नागरिकांंना घरबसल्या दूध, भाजीपाला, औषधं मिळणार; 'या' संपर्क क्रमांकावर मिळेल मदत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं ट्वीट
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 झाली आहे.आज सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत व मुंबई येथे 4 सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत.
यापैकी 14 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 25, 2020
भारत देशामध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा 550 च्या पार गेला आहे. अद्याप COVID 19 या आजारावर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने त्याचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हात वारंवार स्वच्छ धुणे, ते चेहर्याला न लावणं, शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल किंवा टीश्यू पेपर धरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टंसिंग म्हणजे विलगीकरण हा एकमेव उपाय कोरोनापासून आपला बचाव करू शकतो त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळा आणि घरीच बसा असं कळकळीचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री आणि सरकारी यंत्रणेतील कर्मचारी करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2020 02:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

