ठाणे शहरात मराठीत न बोलू शकणार्या रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाईला सुरूवात
प्रादेशिक परिवहन विभागाने मराठी भाषा अवगत नसलेल्या अमराठी रिक्षाचालकांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून, १०५ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण वर्गानंतरही मराठी न शिकणाऱ्या चालकांना भरारी पथकांमार्फत नोटीस बजावली जात आहे.
मराठीत जुजबी संवादही न साधू शकणार्या अमराठी रिक्षाचालकांवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. 105 दिवसांच्या विशेष मराठी शिकवणी वर्गानंतरही मराठी भाषा न शिकणाऱ्या चालकांवर आता भरारी पथकाकडून थेट कारवाई केली जात आहे. ठाणे जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली असून, सहा ठिकाणी एकाच वेळी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. सकाळपासूनच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भरारी पथकाने तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांना तत्काळ एक महिन्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
ठाण्यात रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाईला सुरूवात
View this post on InstagramA post shared by Loksatta (@loksattalive)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2026 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

