Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र पोलिस खात्यातील 8 अधिकारी तर 29 अन्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात
महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात एकुण 8 पोलिस ऑफिसर आणि 29 अन्य पोलिस कर्मचारी कोव्हिड 19 च्या विळख्यामध्ये अडकले आहेत.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 3000 च्या पार गेल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता हळूहळू कोरोना व्हायरसच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे. मात्र नागरिकांच्या मदतीसाठी आणि रक्षणासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र राबणार्या पोलिस खात्यामध्येही कोरोनाने प्रवेश केला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात एकुण 8 पोलिस ऑफिसर आणि 29 अन्य पोलिस कर्मचारी कोव्हिड 19 च्या विळख्यामध्ये अडकले आहेत. दरम्यान आज (18 एप्रिल) सकाळी पुण्यामध्ये एका पोलिस कॉन्स्टेबल आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं.
महाराष्ट्रामध्ये 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात संचारबंदीचं काटेकोर पलन करण्यासाठी पोलिस खात्यातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र 24 मार्च ते 17 एप्रिल पर्यंतच्या काळात ऑनड्युटी असणारे सुमारे एकुण 37 जण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मुंबई: मानखुर्द मधील Containment Area मध्ये भाजी विक्री करत असल्याने महिला आणि पोलिसात जुंपली (Watch Video).
ANI Tweet
दरम्यान 17 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचं उल्लंघन करणार्यांमध्ये 10,729 जणांना अटक झाली असल्याचं, 33,984 वाहनं जप्त करण्यात आल्याच तर 52 हजार 626 जणांवर कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान जीवघेण्या कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांवर कडक बंधनं सरकारसह महाराष्ट्र पोलिसांना घालावी लागली. अशात अनेकदा नागरिक आणि पोलिसांमध्ये तणावाचे प्रसंग पहायला मिळाले.