Lockdown Effect: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल होणार इतिहासजमा

लॉकडाऊन परिस्थितीमुळ बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचे चक्रच थांबले आहे. असे असताना रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मात्र या स्थितीचा चांगल्या कामासाठी वापर करताना दिसत आहे.

(File Image)

अपघातामुळे अनेकांच्या मृत्युचे कारण बनलेला आणि सध्यास्थितीत मोडकळीस आलेला ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल (Amrutanjan Bridge) आता कायमचा पाडला जाणार आहे. राज्यात असलेली लॉकडाऊन (Lockdown) परिस्थिती आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात घटलेली रस्तेवाहतूक याचा फायदा घेत रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य (MSRDC) हा पूल पाडणार आहे. 4 एप्रिल ते 14 एप्रिल या काळात स्फोटकांचा वापर करुन हा पूल पाडण्यात येणार आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर असलेला धोका ओळखून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. लॉकडाऊन परिस्थितीमुळ बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचे चक्रच थांबले आहे. असे असताना रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मात्र या स्थितीचा चांगल्या कामासाठी वापर करताना दिसत आहे.

रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अमृतांजून पूल पाडण्याचा विचार गेले अनेक दिवस करत होते. मात्र, या पूलाखालून एक्सप्रेस वे जातो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेमहीच वर्दळ असते. अशा स्थितीत हा पूल पाढण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर लॉकडाऊनमुळे ही संधी निर्माण झाली. रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी लागलीच ही संधी साधत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड यांना माहिती देत हा पूल पाढण्याबाबत परवानगी माहितली. जिल्हा दंडाधिऱ्यांनीही वेळीच ही मान्यता दिल्याने आता हा पूल पाडला जाणार आहे. (हेही वाचा, लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने नैराश्येतून युवकाने लावून घेतला फास; आत्महत्येस प्रवृत्त केल्याने राज्यमंत्र्यांच्या सूनेविरुद्ध FIR दाखल)

अमृतांजन पूल इतिहास थोडक्यात

अमृतांजन पूल हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आहे. या मार्गावर सुमारे 45.500 मीटर अंतरावर हा पूल आहे. हा पूल ब्रिटीशकालीन आहे. ब्रिटीशांच्या काळात या पूलावरुन होणारी वाहतूक ही तितकी गतीमान आणि अधिक प्रमाणात नव्हती. मात्र पुढे राज्याच्या विकासासोबत या पूलावरुन होणारी वाहतूक वाढली. परिणामी वहातुकीसाठी पूल अरुंद आणि अपूरा ठरु लागला. त्यातच हा पूल ऐन खंडाळ्याच्या घाटाच्या अलीकडे या पूलाचा खांब येत होता. जो वाहतुकीसाठी अडचण ठरत होता. या पूलावरील अरुंद वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे नागरिकांकडूनही हा पूल पाडण्यात यावा अशी मागणी होत होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement