Coronavirus: कोरोना व्हायरस प्रसाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार, यांच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल करा- अॅड. प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी 'आम्हाला रोगाशी लढायचे आहे रोग्याशी नाही' या कॉलर ट्यूनवरही आक्षेप नोंदवला आहे. या कॉलर ट्यूनवर आक्षेप घेताना आंबेडकर यांनी 'तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतेय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवले जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानानी बोलावे', असेही म्हटले आहे.

PM Narendra Mod, Adv. Prakash Ambedkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

वंचित बहुजन आघाडी (VBH चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रसाराला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरले आहे. पंतप्रधानांना कोरोना व्हायरस प्रसारासाठी जबाबदार धरतानाच त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (IPC Section 302) अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले आहे. या वेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 'आम्हाला रोगाशी लढायचे आहे रोग्याशी नाही' या कॉलर ट्यूनवरही आक्षेप नोंदवला आहे. या कॉलर ट्यूनवर आक्षेप घेताना अॅड आंबेडकर यांनी 'तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतेय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवले जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानानी बोलावे', असेही म्हटले आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी भारतीय जनता पक्षावरही गंभीर आरोप केले आहेत. कोरोना व्हायरसचे निमित्त साधून शासनाने सर्वसामान्य नागरिकांना ब्लॅकमेल केले. तर, भारतीय जनता पक्षाने देशात एकलकोंडी जीवनास सुरुवात केली आहे, असाही आरोप केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, या आधीही देशात विविध आजारांनी अनेक लोक दगावले आहेत. या आधी क्षयरोगाने (टीबी) मोठ्या प्रमाणावर लोक दगावले होते. मात्र, तेव्हा लॉकडाऊन करण्यात आले नाही. मग आताच लॉकडाऊन का केले जात आहे?,असा सवालही आंबेडकर यांनी केला.

अवघा देश लॉकडाऊन आहे, लोकांचे रोजगार बुडाले आहेत. लोक उपाशीपोटी झोपत आहेत, असे असताना सरकार मात्र फोनवर कॉलट्यून लाऊन लोकांना घाबरवत आहे. आज जवळपास तीन महिने होत आले तरीही ही रिंगटोन बदलली जात नाही. यामागे नेमके काय षडयंत्र आहे हे मोदींना सांगितल्याशिवाय कळणार नाही, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर या वेळी म्हणाले. (हेही वाचा, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका)

शासनाने सर्वसामान्य नागरिकांना ब्लॅकमेल केले आहे. त्यामुळे नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्थाले. नागरिकांनी 30 तारीख येण्याची वाट न पाहता सर्वसामान्य आयुष्य जगायला सुरुवात केली पाहीजे. आम्हाला आरोग्य विभागाने जगवलं आहे. लॉकडाऊनने नव्हे असे सांगत अनेकांचे आयुष्य लॉकडाऊने उद्ध्वस्त केले. अनेक लोक लॉकडाऊनमुळे मनोरुग्ण झाले, असा आरोपही आंबेडकर यांनी या वेळी केला.