Karnataka: कर्नाटकमधील भाजप सरकारच्या मंत्र्याची विकेट, ठेकेदार आत्महत्या प्रकरणी देणार राजीनामा

S. Eshwarappa) यांची विकेट पडली आहे. बंगळुरु येथील कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात ईश्वरप्पा यांना राजीनामा द्यावा लागत आहे. येत्या शुक्रवारी (15 एप्रिल) आपण राजीनामा देणार आहोत, असे ईश्वरप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी (14 एप्रिल) सांगितले.

File image of Karnataka Minister KS Eshwarappa | (Photo Credits: ANI)

कर्नाटकमधील (Karnataka) भाजप (BJP) सरकारमधील मंत्री केएस ईश्‍वरप्‍पा (K. S. Eshwarappa) यांची विकेट पडली आहे. बंगळुरु येथील कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात ईश्वरप्पा यांना राजीनामा द्यावा लागत आहे. येत्या शुक्रवारी (15 एप्रिल) आपण राजीनामा देणार आहोत, असे ईश्वरप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी (14 एप्रिल) सांगितले. मी सर्वांना सहकार्याबद्दल धन्यवाद देतो. असेही ते या वेळी म्हणाले. ईश्वरप्पा यांच्या रुपात बोम्मई सरकारला हा मोठा धक्का समजले जात आहे. ईश्वरप्पा यांच्याकडे बोम्मई सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रीपद होते.

संतोष पाटील (Santosh Patil) नामक एका कंत्राटदाराने ईश्वरप्पा यांच्यावर 'कमीशन' मागितल्याचे आरोप केले होते. त्यानंतर मंगळवारी या कंत्राटदाराने कथीत रुपात आत्महत्या केली. संतोष पाटील यांचा मृतदेह एका खासगी लॉजच्या खोलीत आढळून आला होता. या ठेकेदाराने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप संदेशात ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. उडुपी येथे त्यांनी कथीत रुपात आत्महत्या केली. संतोष पाटील यांच्या आत्महत्येला ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. (हेही वाचा, Hardik Patel: 'नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी पक्षात माझी अवस्था', हार्दिक पटेल काँग्रेसवर नाराज)

संतोष पाटील आत्महत्या प्रकरण पुढे आल्यानंतर काँग्रेस सातत्याने ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करत होती. संतोष पाटील हे स्वत: आपण भाजप कार्यकर्ता असल्याचे सांगत. संतोष पाटील यांनी 30 मार्च रोजी आरोप केला होता की, ईश्वरप्पा यांनी 40% कमीशन मागितले होते. ठेकेदाराने आपल्या सुसाईड नोटमध्ये ईश्वरप्पा यांनाच आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. या प्रकरणात ईश्वरप्पा यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 306 अन्वये आत्महत्या आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोतोष पाटील यांच्या बंधुंनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वरप्पा यांचे दोन सहकारी बासवराज आणि रमेश यांचेही नाव एफआयआरमध्ये आहे.