महाविकास आघाडी सरकार लकरच मुस्लिमांसाठी आरक्षण कायदा घेऊन येणार- काँग्रेस नेते असलम शेख

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची राज्यात सत्ता असुन त्यांनी लवकरच मुस्लिम समाजासाठी आरक्षण कायदा घेऊन येणार असल्याचे काँग्रेस नेते असलम शेख (Aslam Shaikh) यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे

Maharashtra Cabinet Minister Aslam Shaikh (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी विकास कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्न सुरु केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची राज्यात सत्ता असुन त्यांनी लवकरच मुस्लिम समाजासाठी आरक्षण कायदा घेऊन येणार असल्याचे काँग्रेस नेते असलम शेख (Aslam Shaikh) यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हा महाविकास आघाडी सरकारमधील सामान्यांसाठीचाच एक भाग आहे. याबाबत असलम शेख यांनी एएनआय यांना अधिक माहिती  दिली आहे. महाविकास आघाडी  सरकारमध्ये असलम शेख हे वस्रउद्योग मंत्री आहेत. तसेच मुंबईच्या पालक मंत्र्यांची भुमिका सुद्धा असलम शेख बजावत आहेत.

असलम शेख यांनी एएनआयला दिलेल्या विधानात  असे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार लवकरच राज्यातील मुस्लिम समाजासाठी आरक्षण कायदा घेऊन येईल. तसेच हा महाविकास आघाडीच्या सरकारमधीसामान्यांसाठीचा एक भाग आहे. काही दिवसांपूर्वीच असलम शेख यांनी झोपडपट्टी धारकांना 500 वर्ग फूट घर देण्यात येणार असे म्हटले होते. त्यानंतर आता असलम शेख यांनी पुन्हा एक मोठे विधान केले आहे.('हिटलरने जे जर्मनीत केले, तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न' गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप)

ANI Tweet:

यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादीचे प्रवक्ता आणि जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना आरक्षण देण्याबाबत विधान केले होते. तेव्हा ही महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्यांकासाठी आरक्षण घेऊन येणार असल्याचे स्पष्ट केले होते. विधानसभा निवडणूक 2019 पार पडण्यापूर्वीच मुस्लिमांना सत्तेत आल्यानंतर राज्यात आरक्षण मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif