Condom Scarcity in Maharashtra: महाराष्ट्रात कंडोम तुटवडा, राज्यभरात AIDS प्रतिबंध मोहिमेत अडथळा
महाराष्ट्र आणि संबंध देशभरातील राज्यांमध्ये एचआयव्ही/एड्स कार्यक्रमांमधील ( HIV/AIDS Programmes) महत्त्वाचा घटक असलल्या मोफत कंडोम पुरवठा कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर खिळ बसली आहे.
NACO News: महाराष्ट्र आणि संबंध देशभरातील राज्यांमध्ये कंडोम तुटवडा ((Condom Scarcity) निर्माण झाल्याने एचआयव्ही/एड्स निर्मुलन कार्यक्रमास ( HIV/AIDS Programmes) मोठ्या प्रमाणावर खिळ बसली आहे. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (National Aids Control Organisation) द्वारा कंडोम खरेदीस सातत्याने विलंब होतो आहे. वाढती मागणी आणि निरोध खरेदीस होत असलेला विलंब पाहता राज्यांनी स्वत:च कंडोम खरेदी करावे असे निर्देश NACO द्वारा देण्यात आले आहेत. त्यामुळे परिणामी महाराष्ट्रात कंडोम टंचाई (Condom Scarcity in Maharashtra) जाणवत आहे. देशातील इतर राज्यातही अशीच स्थिती आहे. एचआयव्ही/एड्स प्रतिबंद, जनजागृती करणाऱ्या डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, कंडोम तुटवड्यामुळे असुरक्षित लैंगिक पद्धतींमुळे नवीन संसर्ग आणि लैंगिक संक्रमित रोगांची आणि रुग्णांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राला प्रतिवर्ष साधारण 3.2 कोटी कंडोमची आवश्यकता
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता राज्याला प्रतिवर्ष साधारण 3.2 कोटी कंडोमची आवश्यकता असते. हा पुरवठा प्रामुख्याने नॅको द्वारे होतोत. या संस्थेद्वारे राज्याला शेवटचा पुरवठा मे (2023) महिन्यात करण्यात आला होता. एकूण वर्षभराचे नियोजन पाहता राज्याला प्रति तिमाही (तीन महिने) 80 लाख कंडोमची गरज भासते. त्यानुसार वितरीत करण्यात आलेले जवळपास 35 लाख कंडोम संपून बराच काळ उलटून गेला. त्यामुळे राज्याकडून अधिकच्या कंडोमची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याची पूर्तता केली जात नाही. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, NGO आणि समुदाय-आधारित संस्थांनी (CBOs) त्यांच्याकडील कंडोमचा साठा पूर्णपणे संपल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्याजवळचा अंतर्गत निधी वापरुन आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) द्वारे कंडोम खरेदी करावी लागत आहे.
मोफत कंडोम पुरवठा एचआयव्ही/एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा भाग
राज्य सरकार आणि सेवाभावी संस्था या एचआयव्ही/एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा भाग म्हणून उच्च जोखीम असलेल्या गटांना कंडोमचा पुरवठा करतात. ज्यामध्ये देहविक्री करणाऱ्या महिला, ट्रान्सजेंडर समुदाय, पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष (MSM), ट्रकचालक आणि स्थलांतरित नागरिक कामगार यांचा समावेश होतो. लैंगिक संबंधातून होणारे संक्रमण टाळण्यासाठी आणि रोगाचा, आजाराचा प्रसार टाळण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. एका आकडेवारीवरुन पुढे येते की, इतर राज्ये आणि मोठ्या शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये कंडोमचा पुरवठा आणि उपलब्धता अधिक आहे.
असुरक्षीत लैंगिक संबंधामुळे संक्रमनाचा धोका
कंडोम खरेदी आणि वाटप याचीही एक प्रक्रिया असते. NACO केंद्राद्वारे कंडोम खरेदी करते. त्यानंतर ते कंडोम ती राज्यांना वाटते. दे पुढे NGO आणि CBOs यांना पुरवले जातात. हे लोक उच्च जोखीम असलेल्या घटकांपर्यंत ते पोहोचवण्याचे काम करतात. मात्र, कंडोमची उपलब्धता कमी झाल्यास तुटवडा वाढतो. परिणामी त्यांना आवश्यकता असलेल्या समूहात कंडोम वाटप करता येत नाही. परिणामी देहविक्री करणारे किंवा भीन्न व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवणारे लोक आवश्यक काळजी न घेताच संबंध ठेवण्याची शक्यता वाढते. कंडोमशिवाय केलेल्या लैंगिक संबंधामध्ये संक्रमणाचा धोका वाढतो. ज्यामुळे एक चूकसुद्धा आयुष्याला महागात पडू शकते.
देहविक्री करणाऱ्या किंवा एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या घटकांमध्ये कंडोमची अनुप्लब्धता असल्यास हे लोक आयुष्यावर झुगार लावतात. जसे की, आपण नेहमीच कंडोम वापरतो. एखाद्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता लैंगिक संबंध ठेवल्यास इतका काय फरक पडतो. पण, असे मनाचे समर्थन करत करत ते आढवड्याभरात एकापेक्षा अनेकांशी असुरक्षीत लैंगिक संबंध ठेवतात. परिणामी त्यांना एचआयव्ही विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.