मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी साधला संवाद; पाहा काय म्हणाले?
यातच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाउन 5.0 ची घोषणा केली होती.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. यातच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाउन 5.0 ची घोषणा केली होती. दरम्यान, या काळात कोणत्या प्रकारची सूट देण्यात येईल, हे केंद्र सरकार कडून जाहिर करण्यात आले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन 5.0 बाबत नियमावली जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. तसेच या लॉकडाउनमध्ये काय सुरु राहणार? काय बंद राहणार याबाबत त्यांनी चर्चा करत आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे . यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचे आहे. ज्यामुळे कोरोनाचापासून स्वताचा बचाव केला जाऊ शकतो. तसेच लॉकडाउन करणे हे सायन्स असेल तर, लॉकडाउन उघडणे हे एक आर्ट आहे. पावसाळा तोंडावर आहे. पाऊस पडला की शेवाळ साठते. त्या शेवाळावरुन आपला पाय घसरु नये म्हणून काळजी घेतो. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला जपून पाऊल टाकावे लागणार आहे. गेल्या आठवड्यात मी संपूर्ण यंत्रणेची बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. करोनासोबत जगायला शिका हे आपण सगळ्यांकडून ऐकतो आहोत. ते जगायचे म्हणजे काय? तर मास्क लावणे हे अपरिहार्य आहे. तसेच शिस्त ही प्रत्येकाने पाळायचीच आहे. बाहेर जाऊन आल्यानंतर हँडवॉशने हात धुणे, सॅनेटायझर वापरणे या सगळ्या गोष्टींचा वापर आवश्यक आहे. दरम्यान, 65 वर्षा वरील असलेल्या जेष्ठ नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. हे देखील वाचा- World No Tobacco Day 2020: ‘जागतिक तंबाखू विरोधी दिनी’ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याची शपथ