Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2018 : 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना आदरांजली वाहिली. देशातील नेत्यांनीही या दिनानिमित्त . बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Photo Credits: Wikipedia Commons)

दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 62 वा महापरिनिर्वाण दिन. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांचे देशाची वैचारिक घडी व्यवस्थित बसवण्यात फार मोठे योगदान आहे. जातिव्यवस्था हा भारतीय समाजाला जडलेला जुनाट आजार. हा आजार मुळापासून उखडून टाकल्याशिवाय भारतीय समाजाची व भारताची प्रगती होणार नाही, ही त्यांची धारणा होती. शिक्षणाची कस धरून, शिक्षणप्रसाराचा ध्यास त्यांनी घेतला होता. राजकीय, सामाजिक, आर्थिक, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र अशा सर्वच विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. बाबासाहेब हे केवळ वैचारिक मांडणी करणारे विचारवंत किंवा तत्त्वज्ञच नव्हते, तर ते एक कृतिशील महापुरुष होते. म्हणूनच भारत सरकारने मानाचा ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा गौरव केला होता. अशा या महामानवाचा दिनांक 6 डिसेंबर 1956 साली मृत्यू झाला. या निमित्त आज देशभरात ठिकठीकाणी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाते. यासाठी दादरच्या चैत्यभूमीवरही लाखो अनुयायी जमा झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना आदरांजली वाहिली. देशातील नेत्यांनीही या दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. (हेही वाचा : चैत्यभूमीवर उसळला जनसागर; मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन)

मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ते स्वतः अभिवादन करताना दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एका व्हिडीओमार्फत बाबासाहेबांबद्दलचे आपले विचार व्यक्त केले आहेत.

जयंत पाटील यांनीदेखील चैत्यभूमी येथे अभिवादन केले

शरद पवार यांनी वाहिलेली श्रद्धांजली

‘सामाजिक समतेबद्दल लढा देणाऱ्या, आपला वारसा संविधानाच्या स्वरूपात मागे सोडून जाणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम’ अशा शब्दात कॉंग्रेस पक्षाने अभिवादन केले आहे.

दादर येथील चैत्‍यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्‍मारकाचे दर्शन घेण्‍यासाठी देशभरातून लाखो अनुयायी जमले आहेत. सकाळी आठच्या सुमारास राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्य़भूमीवर जाऊन घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी मंत्रिमंडळातले अनेक मंत्री त्यांच्यासोबत होते.