CIDCO Lottery 2026 Application: कळंबोली, खारघर, तळोजा मधील घरांसाठी प्राधान्य निवडीचा आज शेवटचा दिवस; अशी करा नोंदणी

सिडकोच्या 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेअंतर्गत ४,७७९ घरांसाठी अर्ज करण्याची आणि बुकिंग रक्कम भरण्याची अंतिम मुदत आज ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजता संपत आहे. सिडकोने या मुदतीनंतर कोणतीही वाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

CIDCO Lottery 2026 Application: कळंबोली,  खारघर, तळोजा मधील घरांसाठी प्राधान्य निवडीचा आज शेवटचा दिवस; अशी करा नोंदणी
Online | Photo Credit: Pixabay.com

CIDCO Lottery 2026 Preference:  सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 15 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आह.एकूण 4779 घरांसाठी उपलब्ध उपलब्ध या घरांसाठी प्राधान्य अर्ज दाखल करण्याचा आज (3 सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. यामध्ये सर्वाधिक 4229 घरे तळोजा सेक्टर 39 येथे, तर 293 घरे खारघर बस डेपो आणि 257 घरे कळंबोली बस डेपो परिसरात उपलब्ध आहेत. तळोजा येथील घरांची किंमत सुमारे 23.50 लाख रुपयांपासून सुरू होते, तर कळंबोली येथे ही किंमत 37.70 लाख रुपयांपर्यंत आणि खारघर येथे 43.50 लाख रुपयांपर्यंत जाते. ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेशी (पीएमएवाय) संलग्न असल्याने पात्र लाभार्थ्यांना अतिरिक्त लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्हांलाही नवी मुंबई मध्ये हक्काचं घर घ्यायचं असेल तर पहा या योजनेत आजच कसा कराल अर्ज?

सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याची पद्धत

  • इच्छुक अर्जदारांना सिडको होम्सच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करावी लागते. यासाठी पूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी पडताळणी करावी लागते.
  • त्यानंतर आधार क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी करून पॅन कार्डचा तपशील भरावा लागतो.
  • पुढील टप्प्यात अर्जदाराला त्याची उत्पन्न श्रेणी (ईडब्ल्यूएस किंवा एलआयजी) निवडून, आवश्यक असल्यास सह-अर्जदाराची माहिती भरावी लागते.
  • ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित स्कॅन प्रती (जेपीजी, पीएनजी किंवा पीडीएफ स्वरूपात, प्रत्येकी 2MB पेक्षा कमी आकाराच्या) अपलोड कराव्या लागतात.
  • यानंतर 236 रुपये (जीएसटीसह) हे नोंदणी शुल्क भरून प्राथमिक नोंदणी पूर्ण होते.  नक्की वाचा: CIDCO Lottery 2026: 'माय प्रिफर्ड सिडको होम' साठी अर्ज करताना 'ही' कागदपत्रे ठरणार अनिवार्य .

पसंतीक्रम आणि बुकिंग रक्कम

  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांना तीन सोडत फेऱ्यांमध्ये एकूण 15 पसंतीक्रम निवडण्याची संधी दिली जाते.
  • प्रत्येक फेरीत किमान एक आणि जास्तीत जास्त पाच ठिकाणांची निवड करता येते.
  • पसंतीक्रम निश्चित केल्यानंतर अर्जदाराला बुकिंग रक्कम भरावी लागते, जी ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 75 हजार रुपये, एलआयजी (1 बीएचके) साठी 1 लाख 50 हजार रुपये आणि एलआयजी (2 बीएचके) साठी 2 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

बुकिंग विंडो बंद झाल्यानंतर पात्र अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाईल. यादीत नाव नसल्यास किंवा माहितीत तफावत आढळल्यास अर्जदार सात दिवसांच्या आत हरकत नोंदवू शकतात. हरकतींचे निराकरण होऊन अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सिडको सोडतीची तारीख जाहीर करेल. सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) दिले जाईल, तर अयशस्वी अर्जदारांची बुकिंग रक्कम 30 दिवसांच्या आत परत केली जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2026 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).