
Navi Mumbai Real Estate News: सिडको नवी मुंबई येथील घरांसाठी (Navi Mumbai CIDCO Houses) लवकरच सोडत (CIDCO Lottery) काढत आहे. साधरण विद्यमान म्हणजेच जून महिन्याच्या अखेरीस ही सोडत निघेल. ज्यामध्ये साधारण 22,000 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. सिडको CIDCO) संचालकांची एक बैठक येत्या बुधवारी पार पडणार आहे. या बैठकीत या घरांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, आगोदरच्या गृहयोजनेत शिल्लख राहिलेल्या 16 हजार घरांचासुद्धा या वेळच्या सिडको लॉटरी मध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे घरांची संख्या अधिक असून, नागरिक त्यास कसा प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता आहे.
सिडको लॉटरीत किती घरांचा समावेश?
म्हाडाप्रमाणेच सिडको ही देखील गृहनिर्माण संस्था आहे. अर्थात दोन्ही संस्थांमध्ये काहीसा भेद निश्चितच आहे. या दोन्ही संस्था सरकार द्वारे उभारलेल्या घरांची सोडत काढत असतात. सिडकोने या आधी 26,000 घरांसाठी सोडत काढली होती. मात्र, त्यास अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरु असलेल्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत विविध नोडमधील घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. या सोडतीमध्ये 22 हजार घरांचा समावेश असणार आहे. जवळपास दहा हजार ग्राहकांनी घराचा पहिला हप्ता भरला आहे. हे ग्राहक पहिल्या सोडतीमध्ये यशस्वी झाले होते. नागरिकांकडून सामाधानकारक प्रसिदात असल्याचेही असे सिडको सांगते. (हेही वाचा, Cidco Lottery: सिडकोच्या 21,399 घरांची महासोडत अवघ्या काही तासांवर; कुठे पाहणार सोडत?)
घरांची सोडत निघणारे संभाव्य परिसर
सिडको द्वारे काढल्या जाणाऱ्या 22,000 घरांसाठी सोडत पुढील परिसरात असू शकते: वाशी, जुईनगर, खारघर, तळोजा, द्रोणागिरी. हा सर्व परिसरत नवी मुंबईच्या अखत्यारित येतो.
म्हाडा लॉटरी दिवाळीत?
दरम्यान, म्हाडा देखील आपल्या 5000 घरांसाठी मुंबईमध्ये सोडत काढण्याच्या तयारीत आहे. येत्या दिवाळीपर्यंत ही सोडत काढली जाऊ शकते. शिवाय मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रात म्हाडाने 19,000 घरं उभारण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यापैकी 5199 घरं मुंबईमध्ये उभारली जाणार आहेत.
CIDCO (City and Industrial Development Corporation of Maharashtra) हे महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे एक नियोजन प्राधिकरण आहे, जे नवी मुंबई आणि इतर नियोजित शहरी भागांचा विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. 1970 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट शहरीकरणाचे नियोजन, गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांचा विकास, तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी आणि नियोजित शहरांचा विकास करण्यासाठी CIDCO महत्त्वाची भूमिका बजावते. याच्या अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, NAINA (Navi Mumbai Airport Influence Notified Area) यांसारखे मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. CIDCOच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांच्या योजना, औद्योगिक क्षेत्रांचे नियोजन आणि नागरी सुविधांचा विकास केला जातो, ज्यामुळे महाराष्ट्रातील शहरीकरण अधिक सुव्यवस्थित आणि नियोजित होते.