IPL Auction 2025 Live

सिंधुदुर्ग येथील आरटीपीसीआर आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. महाराष्ट्र हा जीव की प्राण आहे, तर कोकण हा आमच्यासाठी पाठीचा कणा आहे. त्यामुळेचं कोकण नेहमी शासनाच्या पाठी राहिला आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

CM Uddhav Thackeray Inaugurated RTPCR Laboratory (PC - Twitter)

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा रुग्णालयात 3 कोटी 21 लाख 83 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्वीय निदान (Rheumatic Diagnosis) (मॉलिक्युलर) प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे (RTPCR Laboratory) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन (Online Inaugaration) करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. महाराष्ट्र हा जीव की प्राण आहे, तर कोकण हा आमच्यासाठी पाठीचा कणा आहे. त्यामुळेचं कोकण नेहमी शासनाच्या पाठी राहिला आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबईत 2007 मध्ये कस्तुरबा रुग्णालयात पहिली मॉलिक्युलर लॅबची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पुणे येथे दुसरी लॅब झाली. आज राज्यात अशा शंभर लॅब आहेत. कोरोना सोबत जगताना त्याचे निदान लवकरात लवकर होऊन त्यावर औषधोपचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा लॅब प्रत्येक जिल्हा, शहर आणि तालुक्यात असली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Shiv Sena 54th Foundation Day: उद्धव ठाकरे म्हणाले 'या' कारणासाठीच मुख्यमंत्री झालो; शिवसेना वर्धापन दिन साधेपणाने साजरा)

तळकोकणामध्ये एखादा रोग उद्भवल्यास उपचारासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात अथवा गोवा किंवा अधिक गंभीर स्थिती असेल, तर मुंबईत जावे लागे, अशी परिस्थिती आजपर्यंत होती. आरोग्य सुविधांत वाढ केल्यामुळे ही परिस्थिती आता बदलेल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि सुसज्ज असे रुग्णालय उभारणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.