पूरग्रस्तांना 5 हजार रोख तर उर्वरीत रक्कम खात्यात जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; मंगळवारपासून सुरु होणार प्रक्रिया

या मदतीमधील 5 हजाराची रक्कम पूरग्रस्त कुटुंबाला रोख देण्यात येणार आहे. अर्थसहाय्य तातडीने वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या ठिकाणाचा पूर (Flood) ओसरायला सुरुवात झाली आहे. पूरग्रस्तांसाठी सुरक्षित ठिकाणी छावण्या उभा केल्या आहेत. जेवणाची, जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात आली आहे. अशात शासनाकडून मदत जाहीर झाली आहे. या मदतीमधील 5 हजाराची रक्कम पूरग्रस्त कुटुंबाला रोख देण्यात येणार आहे. अर्थसहाय्य तातडीने वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात होईल. ही माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर (Deepak Mhaiskar) यांनी दिली.

पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ चालू आहे. अनेक सामाजिक संस्था, देवस्थाने, नागरिक आपापल्यापरीने मदत करत आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे ती सरकारची. यासाठी शासनाने मंगळवारपासून पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना 5000 रोख देण्याचा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त भागात चलनाचा तुटवडा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पैसे काढण्यास कोणत्याही खातेदाराला अडचण होणार नाही. बँकेने चेक किंवा पासबुकचा आग्रह धरू नये अशा सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: मुस्लीम समाजाकडून 'ईद'च्या सणाला बकरी न कापण्याचा निर्णय; पूरग्रस्तांना करणार मदत)

ग्रामीण भागातील जिल्हा बँकांना एसबीआयने पैसे पुरवावे असे सांगण्यात आले आहे. पाणी अजून थोडे कमी झाल्यावर कोल्हापूर, सांगलीकडे जीवनावश्यक गोष्टी विशेष गाड्यांनी रवाना होतील. त्यावेळी इतर नागरिकांनी त्याच रस्त्यावरून जाण्याचा आग्रह धरू नये असेही आवाहन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे आणि स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेणे या दोन महत्वाच्या सूचना आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif