Chhagan Bhujbal On Maratha Reservation Ordinance: 'झुंडशाहीने कायदे बदलता येणार नाहीत'; मुख्यमंत्री शिंदे, जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर छगन भुजबळ यांची समोर आली पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या मागणीनुसार, मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना 100 टक्के शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाचा (Reservation) मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मागणीसाठी जालना पासून मुंबईकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली एक मोर्चा येत होता. दरम्यान काल रात्री राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये जरांगे पाटलांची भेट घेत आध्यादेश सुपूर्त केला आहे. या घडामोडींनंतर ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षणाचा विरोध करणार्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. झुंडशाहीने कायदे बदलता येणार नाहीत असे ते म्हणाले आहेत.
छगन भुजबळ यांनी यावर बोलताना 'सरकारने काढलेले राजपत्र हा अध्यादेश नसून केवळ मसुदा आहे. यावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागण्यात आल्या आहेत. त्यामुळे ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास करावा लागेल' असं म्हटलं आहे. ओबीसींनी 16 फेब्रुवारी पर्यंत आपल्या हरकती नोंदव्यावा असं आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला देखील केलं आहे. सरकारने सरसकट गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील मान्य केल्याने भुजबळांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. 'सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही' असेही भुजबळ म्हणाले आहेत.
मनोज जरांगेंच्या मागणीनुसार, मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना 100 टक्के शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी पूर्ण झाली आहे. Manoj Jarange Patil ends his Fast: मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना आध्यादेश सुपूर्द; ज्यूस पाजत संपवलं उपोषण .
दरम्यान जरांग़े पाटील यांनी वाशीमधून उपस्थितांना संबोधित करताना ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वैर नाही. काही जण मुद्दामून तसा प्रयत्न करत आहेत. पण दोन्ही समाज एकत्र राहतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी देखील इतर समाजांवर आपण अन्याय होऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)