Chhagan Bhujabal-Devendra Fadnavis Meet: ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्नी छगन भुजबळ यांनी आज घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
छगन भुजबळ यांनी ट्वीटर वर या भेटीचा फोटो शेअर करत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते. अशी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षण प्रश्नावरून एकीकडे महाराष्ट्र सरकार केंद्रासोबत चर्चा करत असताना सर्वोच्च न्यायलयाकडून निवडणूकीमधील राजकीय आरक्षण देखील रद्द करण्यात आलं आहे. यावरूनच सध्या राज्यात सत्ताधारी- विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान आज (15 जुलै) राजकीय मतभेद बाजुला ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छ्गन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांनी ट्वीटर वर या भेटीचा फोटो शेअर करत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Reservation) सकारात्मक चर्चा झाली. सोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते. अशी माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षणासाठी केंद्राकडे इम्पेरिकल डाटा मागण्याचा ठराव मंजूर करताना देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ दोघेही आक्रमक झालेले पहायला मिळाले होते. त्यावेळी झालेल्या अभुतपूर्व राड्यानंतर भाजपाचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित देखील झाले आहेत. मात्र आज ओबीसी आरक्षण विषयी पुन्हा दोघांनी सविस्तर चर्चा केली आहे. नक्की वाचा: Maharashtra Monsoon Assembly Session 2021: केंद्र सरकारने OBC चा Empirical Data द्यावा; सत्ताधारी- विरोधकांच्या गदारोळामध्ये विधानसभेत ठराव मंजूर.
छगन भुजबळ ट्वीट
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 'ओबीसीं' समाजाच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2021 मध्ये स्थगिती दिली आहे. यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डाटा मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी छ्गन भुजबळांची आहे आणि त्यासाठीच आज पुन्हा दोघांमध्ये चर्चा झालेली असू शकते.