चेंबूर: प्रियकरासोबत पत्नी पळाली; 2 चिमूकल्यांची हत्या करुन पतीची आत्महत्या
ही घटना चेंबूर (Chembur) येथील वाशीनाका (Vashi Naka) परिसरात रविवारी सकाळी घडली.
पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने तरुणाने आपल्या 2 चिमुकल्यांची हत्या करुन स्वत: गळफास लावून हत्या केली. ही घटना चेंबूर (Chembur) येथील वाशीनाका (Vashi Naka) परिसरात रविवारी सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कृत्याचे नमके कारण अस्पष्ट असून पत्नी पळून गेल्याच्या नैराश्य अवस्थेत होता. यातून आपल्या मुलासह त्याने स्वताचे जीवन संपवले आहे. या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरात खळबळ उडाली असून मृतांच्या नातेवाईकांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे.
दिनेश यादव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह वाशिनाका येथील मॉडेल हायस्कूल शेजारी राहत होता. गेल्या काहीवर्षापूर्वीच दिनेश याचे एका तरुणीशी लग्न झाले होते. तसेच त्याच्या पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबध होते. यातून दिनेशच्या पत्नीने गेल्या काही दिवसापूर्वी अनैतिक संबध असलेल्या तरुणासोबत पळून गेली. हा धक्का दिनेश सहन करु शकला नाही. आपल्या पत्नीच्या कृत्यामुळे आपली नाचक्की झाली आहे. त्याचबरोबर आपल्याला समाजात वावरता येत नाही. या नैराश्यातून दिनेशने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- मुंबई: अंधेरी MIDC येथील 31 वर्षीय डॉक्टर महिलेची आत्महत्या
आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी त्याने आपल्या दोन्ही मुलांना खाण्यात विष घालून खावयास दिले. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याने स्वताला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी 10 वाजले तरी दिनेशने दार उघडले नसल्यामुळे शेजऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी दिनेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.