Chandrakant Khaire Tested COVID19 Positive: शिवसेना नेते चंद्रकात खैरे यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती
Chandrakant Khaire Tested COVID19 Positive: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्याने त्याच्यावरील लसी कधी येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खैरे यांनी त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.
चंद्रकांत खैरे यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, माझी माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून सिग्मा हॉस्पिटल संभाजीनगर येथे दाखल झालो आहे.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.(Sharad Pawar Gets Angry: शरद पवार पत्रकारांवर चिडले, म्हणाले 'तुम्ही माझा वेळ वाया घालवता आहात')
Tweet:
यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, देवेंद्र फडवणीस यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने असा दावा केला आहे की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस बाजारात आणता येईल. लवकरच जगातील सर्वात मोठी लवकरच लस उत्पादक सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया केंद्र सरकारसोबत लसीचा पुरवठा करारावर स्वाक्षरी करेल. सीरमने कोव्हीशिल्डच्या इमर्जन्सी वापरासाठी नियामकाकडे अर्ज केला आहे. महत्वाचे म्हणजे या लसची किंमत प्रति डोस 250 रुपये निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.