CBI Scam Mumbai: सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून रेल्वे अधिकाऱ्याची फसवणूक; Digital Arrest द्वारे 9 लाख रुपयांचा गंडा

ही घटना मुंबई येथे घडली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीने त्याला आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली.

fraud | (File image)

सीबीआय (CBI Scam) अधिकारी असल्याचे भासवून तोतयाने एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यास (Railway Official) तब्बल 9 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना मुंबई येथे घडली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीने त्याला आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली. तुमचे नाव मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आल्याचे सांगून त्याने या अधिकाऱ्यास आर्थिक गंडा घातला. अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तापस सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी पीडितास 20 तास व्हिडिओ कॉलवर गुंतवणून ठेवले. डिजिटल अटक (Digital Arrest) करुन फसवणुक केल्याच्या या प्रकाराने परिसरा खळबळ उडाली आहे.

पीडितास 20 तास व्हिडिओ कॉलवर गुंतवले

धक्कादायक म्हणजे, आरोपीने आपण केवळ सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले नाही. तर तसा बनावही रचला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यास व्हिडिओ कॉल केला. तसेच, तुमचे नाव मनी लॉन्ड्रीग प्रकरणात आले असून, तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे न्यायाधिशांच्या पुढे हजर राहावे लागणार असल्याचे सांगितले. ही घटना सोमवारी (18 सप्टेंबर) रोजी घडली. फसवणूक करणाऱ्या अज्ञात अरोपीने पीडितास तब्बल 20 तासांहून अधिक काळ व्हिडिओ कॉलवर गुंतवून ठेवले. हा डिजिटल अटक प्रकारच असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, Digital Arrest Cyber Fraud Thane: ठाणे येथे सायबर घोटाळा; डिजिटल अटक करुन ज्येष्ठ नागरिकास 85 लाख रुपयांना गंडा)

पीडित व्यक्ती रेल्वेत अधिकारी

सायबर फसवणूक झालेला 59 वर्षीय पीडित व्यक्ती हा मध्य रेल्वेचा वरिष्ठ अभियंता असून तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सेवा बजावतो. तो मुंबई येथील कुलाबा परिसरातील राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे. 16 सप्टेंबर रोजी सकाळी त्याच्या फोनवर एक रॉकॉर्डेड मेसेज आला. ज्यामध्ये त्याला सांगण्यात आले की, त्याचा फोन पुढच्या दोन तासांमध्ये ब्लॉक करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर '0' डायल करा. पीडिताने शून्य डायल केले. ज्यामुळे थेट व्हिडिओ कॉल सुरु झाला. (हेही वाचा, Vile Parle Telecom Fraud: मुंबईतील विलेपार्ले येथे दूरसंचार फसवणूक; 75 वर्षीय नागरिकाने 8 लाख रुपये गमावले)

व्हिडिओवर एक व्यक्ती बोलत होता. ज्याने स्वत:ची ओळख CBI चा वरिष्ठ अधिकारी अशी करुन दिली. त्याने सांगितले की, एका मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आपली चौकशी करायची आहे. कारण आपला फोन क्रमांक एका मनी लॉन्ड्रींग प्रकरणासाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्याशी जोडण्यात आला आहे.

दरम्यान, आपला फोन क्रमांक इतर कोणत्याही खात्याशी संलग्नीत नसल्याचे सांगून पीडिताने आपले म्हणने मांडले. मात्र, समोरील व्यक्तीने आपला फोन नंबर 5.8 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात नरेश गोयल नामक व्यक्तीसोबत जोडला गेल्याचे सांगितले. दरम्यान, पीडित अधिकारी आपल्या कार्यालायत गेली असता आरोपींनी तीस चौकशीच्या नावाखालीली घरी परतण्यास भाग पाडले. शेवटी पीडिता घरी गेल्यावर दुपारी 2 वाजलेपासून फोन कॉल सुरु झाला.

आरोपींनी पीडिताकडून नोकरी, हुद्दा, कौटुंबीक पार्श्वभूमी यांसारखी सर्व माहिती जमा केली आणि नंतर त्याला सांगितले की, त्यास ऑनलाईन कोर्टात हजर केले जाईल. थोड्या वेळाने त्याला माहिती देण्यात आली की, त्यास कोर्टात हजर करण्यात आले असून, बँक खात्याची सर्व माहिती सादर करण्यात यावी. दरम्यान, आरोपींनी पीडितास जबरदस्ती करत बँकेत जाऊन त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर विशिष्ट रक्कम भरण्यास सांगितले. जी पीडिताने आरटीजीएस करुन भरली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे पीडिताच्या लक्षात आले. त्यांनी बँकेत जाऊन व्यवहार थांबविण्याची विनंती केली. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगितले. अखेर पीडिताने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.