Cat killing in Thane: मंजर दुसऱ्या मजल्यावरुन फेकून हत्या, ठाणे येथील एकावर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने एक मांजर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली टाकले. ज्यामुळे मांजराचा मृत्यू ( Cat Killing) झाल.

Cat | Representational image (Photo Credits: pxhere)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivli) येथे पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने एक मांजर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली टाकले. ज्यामुळे मांजराचा मृत्यू ( Cat Killing) झाल. ही घटना डोंबिवली परिसरातील ठाकुर्ली येथील एका गृहनिर्माण संकुलात बुधवारी रात्री 9.30 वाजणेच्या सुमारास घडली. एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, इमारतीतील एका रहिवाशाने मांजरीला दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून फेकून दिले. ज्यामुळे चे जागीच ठार झाले.

पोलिसांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन प्राण्यांवरील क्रुरतेविरोधातील कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. (हेही वाचा, कल्याण: कबूतराच्या जीवाशी क्रूरतेने खेळणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल)

मांजर हा एक लहान, मांसाहारी सस्तन प्राणी आहे. ज्याला अनेकदा पाळीव प्राणी म्हणून नागरिक सोबत ठेवतात. शहरांमध्ये मांजर हा एक हौस म्हणून पाळण्याच विषय समजला जातो. किंबहून पाळली जाते. खेडोपाडी घरात धनधान्यांच्या राशींमुळे होणारा उंदरांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने मांजर पाळले जाते. मांजरी त्यांच्या स्वतंत्र स्वभाव, चपळता आणि शिकार कौशल्यांसाठी ओळखल्या जातात. ते हजारो वर्षांपासून पाळीव प्राणी आहेत . कुत्र्याप्रमाणेच मांजरही जगभरातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी बनले आहेत.

मांजरींचा स्वभाव खेळकर असतो. खेळात गुंतणे त्यांच्यासाठी केवळ मनोरंजकच नाही तर, त्यांना शारीरिक आणि मानसिकरित्या उत्तेजित राहण्यास मदत करते. ते खेळण्यांचा पाठलाग करू शकतात, कॅटनीपशी संवाद साधू शकतात किंवा त्यांच्या मानवी साथीदारांसह परस्पर खेळात गुंतू शकतात. मांजरींमध्ये तीक्ष्ण दृष्टी, तीव्र श्रवणशक्ती आणि गंधाची उच्च विकसित भावना यासह उत्कृष्ट संवेदना असतात. त्यांचे व्हिस्कर्स देखील संवेदनशील असतात आणि त्यांना त्यांच्या वातावरणात नेव्हिगेट करण्यात आणि वस्तू शोधण्यात मदत करतात. मांजरी त्यांच्या सहचर, तुलनेने कमी देखभाल गरजा आणि विविध सजीव वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता यामुळे लोकप्रिय पाळीव प्राणी ठरतात.