Accident On Dhule-Solapur Highway: चालकाला लागली डुलकी! धुळे-सोलापूर महामार्गावर कारची ट्रकला धडक; एकाचा मृत्यू

या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली. मृताचे नाव पी. रमेश पी. कृष्णमूर्ती असे आहे. तसेच जखमी प्रवाशाचे नाव श्रीराम दहिता असे आहे. ते दोघेही हैदराबादचे रहिवाशी आहेत.

Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Edited Image)

Accident On Dhule-Solapur Highway: धुळे-सोलापूर महामार्गावर (Dhule-Solapur Highway) भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या एका हायस्पीड एर्टिगा कारचा चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. ही घटना रविवारी सकाळी 7:30 च्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावरील सौंदलगावजवळ घडली. प्राप्त माहितीनुसार, एपी 11 एटी 0455 क्रमांकाची ही कार हैदराबादहून शिर्डीकडे वेगाने जात होती. चालकाला झोप लागली, त्याने गाडीवरील नियंत्रण गमावले आणि कार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला समोरासमोर धडकली.

ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली. मृताचे नाव पी. रमेश पी. कृष्णमूर्ती असे आहे. तसेच जखमी प्रवाशाचे नाव श्रीराम दहिता असे आहे. ते दोघेही हैदराबादचे रहिवाशी आहेत. (हेही वाचा - Pune Road Accident: मद्यधुंद चालकाने MPSC विद्यार्थ्यासह 12 जणांना चिरडले; पुणे येथील सदाशिव पेठेत कार अपघात)

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताचं हायवे रुग्णवाहिका 1033 आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना लोखंडी कटरचा वापर करावा लागला. तथापि, या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. (हेही वाचा, Palghar Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारची कंटेनरला धडक; महिलेसह तिघांचा मृत्यू)

अपघातानंतर धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली. गोंदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रस्ता मोकळा केला. या भीषण अपघातामुळे महामार्गावर लोकांची मोठी गर्दी झाली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement