Bribery case: राणा कपूर यांना मुंबई स्पेशल कोर्टाकडून दिलासा, अटकेपूर्वी येत्या 11 जुलै पर्यंत अंतरिम प्रोटेक्शन मिळणार

येस बँकेचे (Yes Bank) संस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांच्या विरोधात कथित रुपात एका रियॅल्टी कंपनीकडून लाच घेतल्याच्या प्रकरणी सीबीआयच्या द्वारे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणी दिलासा मिळाला आहे

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर (Photo Credits-Twitter)

येस बँकेचे (Yes Bank) संस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांच्या विरोधात कथित रुपात एका रियॅल्टी कंपनीकडून लाच घेतल्याच्या प्रकरणी सीबीआयच्या द्वारे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईतील स्पेशल कोर्टाने गुरुवारी याबाबत निर्णय देत कपूर यांना अटकेपूर्वी येत्या 11 जुलै पर्यंत अंतरिम प्रोटेक्शन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.(येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची मुलगी रोशनी हिला मुंबई विमानतळावर अडवले)

सीबीआयने मार्च महिन्यात राणा कपूर यांच्या विरोधात दिल्लीतील लुटियन झोनमध्ये अवांता समूहाकडून एक बंगला खरेदी करताना कथित रुपात 307 कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या बदल्यात कपूर यांनी अवांता समूहाच्या कंपन्यांना जवळजवळ 1,900 कोटी रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करुन दिले होते.(Yes Bank Crisis: येस बँकेला उतरती कळा? संस्थापक राणा कपूर यांनी 510 कोटींना विकली भागीदारी)

तर मार्च महिन्यात राणा कपूर यांना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी  यांनी विकलेली पेटींग ईडी  कडून सील करण्यात आली होती. जीव गांधी यांची ही पेटींग्स राणा कपूर यांनी प्रियंका गांधींकडून तब्बल 2 कोटी रुपयांना खरेदी केली होती. ही पेटींग्स खरेदी करण्यासाठी माझ्यावर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा  यांनी दबाव टाकला होता, अशी माहिती राणा कपूर यांनी मुंबईच्या ईडी ऑफिसमध्ये दिली होती.

तसेच जून महिन्यात सीबीआय यांनी राणा कपूर, त्यांची मुलगी आणि डीएचएफलचे प्रमोटर आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल आणि धीरज वाधवान यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेले हे आरोप पत्र जवळजवळ 100 पानांचे आहे. तसेच आरोप पत्रात DOiT अर्बन वेंचर्स लिमिटेड यांचे नाव सुद्धा सामील आहे.