Beed Shocker: बीडमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिक सुरुचं! प्रेयसीने बोलणं बंद केल्याने संतापला बॉयफ्रेड; थेट गर्लफ्रेडच्या घरी जाऊन खिडकीतून केला गोळीबार

बीड जिल्ह्यातून आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेजोगाई तालुक्यामध्ये गर्लफ्रेडने बोलणं बंद केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेडने चक्क प्रेयसीच्या घरी जाऊन खिडकीतून गोळीबार केला. या घटनेमुळे सर्वांनाचं धक्का बसला आहे.

Boyfriend went to girlfriend's house and shot through window (फोटो सौजन्य - Pixabay)

Beed Shocker: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा (Beed District) संपूर्ण देशभरात चर्चेत आला आहे. परंतु, देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातून गुन्हेगारी घटनांची मालिका कमी होण्याचं नाव घेत नाहीये. बीड जिल्ह्यातून आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेजोगाई तालुक्यामध्ये (Ambajogai Taluka) गर्लफ्रेडने बोलणं बंद केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेडने चक्क प्रेयसीच्या घरी जाऊन खिडकीतून गोळीबार (Firing) केला. या घटनेमुळे सर्वांनाचं धक्का बसला आहे.

गणेश चव्हाण असं या आरोपचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुदैवाने या घटनेत तरुणीला तसेच तिच्या घरच्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच तरुणांना गावठी कट्ट्याची उपलब्धता कशी आणि कोण करून देतं? हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. (हेही वाचा - Pune Firing Case: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईलवर गेम खेळताना दोन मित्रांमध्ये वाद; मित्रावर गावठी कट्ट्यातून केला गोळीबार)

आरोपीने घराच्या खिडकीतून केला गोळीबार -

प्राप्त माहितीनुसार, गणेश चव्हाण याचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीने गणेश चव्हाणच्या त्रासाला कंटाळून त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यानंतर गणेशने तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी तरुणीच्या घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला. परंतु, घरातील कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आरोपीने घराच्या खिडकीतून गोळीबार केला. मात्र, कुटुंबिय एका खोलीत लपवून बसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. आरोपीने गावठी कट्ट्यातून तरुणीच्या घरावर गोळीबार केला. (हेही वाचा -Firing Incident at Badlapur Railway Station: बदलापूर हादरले! रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना, पोलिसांकडून तपास सुरु)

संतोष देशमुख हत्या प्रकरण -

सध्या बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मोठा संघर्ष उभा राहिला आहे. देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. सध्या वाल्मिक कराड यांचे समर्थक त्यांच्या सुटकेसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now